भाजपने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर आंदोलन करावं, संजय राऊतांचा खोचक सल्ला

| Updated on: Feb 21, 2021 | 4:44 PM

संजय राऊत यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन भाजपवर निशाणा साधला (Sanjay Raut slams BJP over petrol diesel price hike).

भाजपने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर आंदोलन करावं, संजय राऊतांचा खोचक सल्ला
पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो, स्वाभिमानाचे प्रतिक असते.
Follow us on

इंदापूर (पुणे): “वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात भारतीय जनता पक्षानं आंदोलन करावं. महागाई आहे, त्यामुळे निदान महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने तरी आंदोलन करावं”, असा खोचक सल्ला शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला दिला आहे. राऊत आज एका खासगी कार्यक्रमानिमित्ताने इंदापूर दौऱ्यावर आहेत. इंदापूरात प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला (Sanjay Raut slams BJP over petrol diesel price hike).

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार?

“कोरोनाबाबत लोकं नियम पाळत नाहीत, शिस्त पाळत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार आवाहन करतात. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करायचंय का? हा लोकांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा. फक्त मुंबईत नव्हे तर ग्रामीण भागातही कोरोना वाढतोय”, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

‘विरोधकांनी कोरोनावर राजकारण करु नये’

“विरोधकांनी कोरोनावर राजकारण करु नये. हा लोकांच्या जीविताचा प्रश्न आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात समन्वय असल्याशिवाय कोरोनाशी लढता येणार नाही”, असंदेखील मत संजय राऊत यांनी यावेळी मांडलं.

पेट्रोल-डिझेल दरवाढीवर निर्मला सीतारमण यांना चर्चेचं निमंत्रण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इंधन दरवाढीवर राज्य आणि केंद्र सरकारने चर्चा करावी, अंस मत मांडलं आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी सीतारमण यांना चर्चेला येण्याचं निमंत्रण दिलं आहे (Sanjay Raut slams BJP over petrol diesel price hike).

निर्मला सीतारमण पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर नेमकं काय म्हणाल्या?

पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही सध्या एक गंभीर समस्या झाली आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जास्त पैसे खर्च करावे लागत आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर निर्मला सीतारमण यांनी काल (21 फेब्रुवारी) प्रतिक्रिया दिली. “पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर कोणतंही उत्तर देणं योग्य नाही. किंमत कमी करणं हेच त्यावर उत्तर आहे. यासाठी केंद्र आणि राज्य दोन्ही पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

हेही वाचा : हर्षवर्धन पाटील आणि संजय राऊतांची गळाभेट, अनेकांच्या भुवया उंचावल्या; पाटील म्हणाले…