AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7695 अर्ज तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी 13023 अर्ज दाखल

गेल्या महिन्यातच (डिसेंबर 2025) महाराष्ट्रात विविध नगरपालिकांसाठी निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान झाले. आता केवळ 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.

राज्यात जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7695 अर्ज तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी 13023 अर्ज दाखल
zp and Panchayat Samiti election
| Edited By: | Updated on: Jan 22, 2026 | 8:14 PM
Share

महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी आणि 125 पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी निवडणूक होत असून येत्या 5 फेब्रुवारीला मतदान आहे. या निवडणूकांचा निकाल 7 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7695 अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी 13023 अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांबाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर तारीख जाहीर होणार आहेत.

रायगड जिल्ह्यातील ५९ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ३९१ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. तर ११८ सदस्य संख्या असलेल्या रायगड पंचायत समितीसाठी ६९७ नामनिदर्शेन पत्रे दाखल झाली आहेत. रत्नागिरीतील ५६ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी २२६ नामनिदर्शेन पत्रे दाखल झाली आहेत. तर ११२ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीसाठी ४४४ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी २७२ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.तर १०० सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीसाठी ४४१ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. पुणे जिल्ह्यातील ७३ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ८५३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. तर १४६ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीसाठी १४८२ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.

सातारा जिल्ह्यात काय स्थिती

सातारा जिल्ह्यातील ६५ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ६३२ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.तर १३० सदस्य संख्या असलेल्या पंचायत समिती १०५९ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. सांगलीतील ६१ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ७४६ अर्ज आले आहेत तर १२२ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीसाठी १२८९ अर्ज आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील ६८ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ७५६ अर्ज आले आहेत. तर १३६ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीसाठी १३७१ अर्ज आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ६८ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ९०७ अर्ज आले आहेत तर १३६ सदस्य असलेल्या पंचायत समितीसाठी १५२९ अर्ज आले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या ६३ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ७६२ अर्ज आले तर १२६ सदस्य असलेल्या पंचायत समितीसाठी १४५६ अर्ज आले आहेत.

तर परभणी जिल्हा परिषदेच्या ५४ जागांसाठी ५८६ अर्ज तर १०८ सदस्य असलेल्या पंचायत समितीसाठी ९४४ अर्ज आले आहेत. धाराशिव जिल्हातील ५५ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ९६७ अर्ज आले आहेत. तर ११० सदस्य असलेल्या पंचायत समितीसाठी १३६० अर्ज आले आहेत. लातूरच्या ५९ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ५९७ अर्ज आले आहेत तर ११८ सदस्य असलेल्या पंचायत समितीसाठी ९५१ अर्ज आले आहेत.

आमदार अब्दुल सत्तार यांचा दुसरा मुलगा रिंगणात

छत्रपती संभाजीनगरात जिल्हापरिषद निवडणूकीत आमदार अब्दुल सत्तार यांचा दुसरा मुलगा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहे. पैठण नगर परिषदमध्ये सत्ता स्थापन करीत पहिला मुलगा अब्दुल समीर सत्तार याला आमदार अब्दुल सत्तार यांनी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवले. आता अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला जिल्हा परिषद निवडणूकमध्ये उभे केले आहे. आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल आमेर सत्तार हा अंबई जिल्हा परिषदेच्या सर्कल मधून निवडणूक लढवत आहे.

संदीपान भुमरे यांच्या पुतण्याला संधी

पैठणच्या पाचोड जिल्हा परिषद गटातून खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांच्या पुतण्याला संधी दिली आहे. जिल्हा परिषद निवडणूकीमध्ये अनेक ठिकाणी नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकिटे दिली आहेत. खासदार संदीपान भुमरे यांचा पुतण्या शिवराज भुमरे पैठणच्या पाचोड गटातून जिल्हा परिषद निवडणूकसाठी उभा आहे.

लातूरात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत

लातूर जिल्हा परिषदेच्या 59 पैकी 51 जागांवर भाजपा लढत आहे.  भाजपाची राष्ट्रवादी सोबत उदगीर, जळकोट आणि चाकुर तालुक्यात युती झाली आहे. तर शिवसेना शिंदे केवळ एका जागेवर लढते आहे, तिथे भाजपाने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. भाजपा 51 तर राष्ट्रवादी दादा 07 जागांवर लढत आहे. जास्तीत जास्त जागा भाजपाकडे आहेत त्यामुळे जिल्ह्यात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत.

zilla parishad and Panchayat Samiti election

zilla parishad and Panchayat Samiti election

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.