पाऊले चालती पंढरीची वाट, ज्येष्ठ आणि दृष्टिहीनही वारीतील पालखीत सहभागी

काही जण आजारी असूनही आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. त्यासाठी धडपड करत आहेत. इच्छाशक्ती असल्यामुळे ते पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी जात आहेत.

पाऊले चालती पंढरीची वाट, ज्येष्ठ आणि दृष्टिहीनही वारीतील पालखीत सहभागी
| Updated on: Jun 12, 2023 | 9:36 PM

प्रतिनिधी, पुणे : पुणे-मुंबई हायवेवरून संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने जात आहे. या पालखीत ज्यांना व्यवस्थित चालता येत नाही, असे काही लोकं सहभागी झाले आहेत. तर काही भक्तांना व्यवस्थित दिसत नाही, तरीही ते पालखीत सहभागी झाले आहेत. आषाढी वारीनिमित्त राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. काही जणांनी ८० चं वय पार केलं आहे. त्यामुळे ते व्यवस्थित चालू शकत नाही. काही जण आजारी असूनही आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. त्यासाठी धडपड करत आहेत. इच्छाशक्ती असल्यामुळे ते पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी जात आहेत.

वारकरी आणि दींडी यांचे काही समूह पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. काही वारकऱ्यांचे समूह स्थानिक साखर कारख्यान्यांमध्ये काम करतात. वर्षभरानंतर आषाढीनिमित्त या कालावधीत ते सुट्या घेतात. वारीसाठी आम्ही सुट्या घेत असल्याचं हे वारकरी सांगतात.

वारीमध्ये २१ दिवस पायी चालतात

वारीमध्ये आम्हाला २१ दिवस पायी चालत जावे लागते. त्यामुळे वर्षभर आम्ही सुटी घेत नाही. आजारी पडल्यास सुट्या घ्याव्याच लागतात, असं नागनाथ देवकर म्हणाले.

वारी हा आमच्या जीवनाचा एक भाग आहे. वारीसाठी आम्ही वर्षभर वाट पाहत असतो. आम्ही शेतकरी आहोत. आम्ही वारीला जातो तेव्हा आमची मुलं शेतीकडे लक्ष देतात, असं राजाराम चोपडे यांनी सांगितलं.

 

काठीच्या आधार घेत चालतात

वाल्मिकी थोरात हे जन्मापासून दृष्टिहीन आहेत. पण, ते वारकऱ्यांसोबत चालत येतात. पुणे-मुंबई हायवेवरून ते वारकऱ्यांसोबत चालत आले. थोरात यांनी चालताना काठीचा आधार घेतला. मी दौंड येथील आहे आणि गेल्या दोन दशकांपासून वारीला येत असल्याचं थोरात यांनी सांगितलं.

पाच वर्षांपूर्वी थोरात यांची पत्नी मरण पावली. मुलं शेती सांभाळत आहेत. परंतु, देवाच्या मार्गाने मला स्वतःला गुंतवूण ठेवायचे आहे. मी पाहू शकत नसलो, तरी मी चालतो. पंढरपूरपर्यंत मी चालणार आहे. लोकं माझी काळजी घेतात. काही जण आम्हाला अन्न पुरवतात. देवच आमची काळजी घेत असल्याचंही थोरात म्हणतात.

७० वर्षीय तुकाराम खरात हे काठीच्या आधाराशिवाय चालू शकत नाही. ते व्यवस्थित उभे राहू शकत नाही. पाठीच्या कण्याच्या त्रासासाठी ते रुग्णालयात भरती झाले होते. तरीही ते काठीच्या आधाराने पंढरपूरच्या दिशेने वारकऱ्यांसोबत जात आहेत. इंडियन एक्सप्रेसवरून हे वृत्त दिलं आहे.