Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराज पालखीचं इंदापूर मुक्कामाचं ठिकाण बदललं! काय म्हणाले जिल्हाधिकारी?

| Updated on: Jun 10, 2022 | 11:14 AM

संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनरोजी देहूमधून प्रस्थान ठेवणार आहे. पालखीचा इंदापुरातील मुक्काम यावेळी बदलला आहे. विश्वस्त आणि महाविद्यालयाची बोलणी सुरू असल्याची माहिती विजय देशमुख यांनी दिली आहे.

Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराज पालखीचं इंदापूर मुक्कामाचं ठिकाण बदललं! काय म्हणाले जिल्हाधिकारी?
संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम इंदापूर येथील स्थळाची पाहणी करताना जिल्हाधिकारी विजय देशमुख
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : इंदापूर शहरात येत्या काही दिवसात संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj Palkhi) येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख (Vijay Deshmukh) यांनी शहरातील पालखी स्थळ व रिंगण सोहळा मैदानाची पाहणी केली. यावेळी तुकाराम महाराज पालखीचा पूर्वी पालखी मुक्काम हा नारायणदास हायस्कूल, इंदापूर येथे होता. परंतू या वर्षी आय. टी. आय. कॉलेज येथे होणार आहे. अद्यापही स्थळाबाबत बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र पालखी स्थळ या वर्षी आयटीआय या ठिकाणीच असल्याचे स्पष्ट संकेत पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे पालखी स्थळ बदलल्याने आता यावर इंदापूर (Indapur) शहरात वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.

विश्वस्त आणि महाविद्यालयाची बोलणी

संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनरोजी देहूमधून प्रस्थान ठेवणार आहे. पालखीचा इंदापुरातील मुक्काम यावेळी बदलला आहे. विश्वस्त आणि महाविद्यालयाची बोलणी सुरू असल्याची माहिती विजय देशमुख यांनी दिली आहे. जो काही निर्णय होईल, त्याप्रमाणे प्रशासनाची तयारी असेल. असे ते म्हणाले. तर पालखी मार्गावर काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. पालखी जाण्यासाठी रस्ता चांगला करण्याचा प्रयत्न करत आहोत. पालखी तळावरची वाहने पहिल्यांदा मार्गस्थ करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

पालखी गावात जाणार की नाही?

पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आम्ही आयडेंटीफाय केले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, अशी ग्वाही विजय देशमुख यांनी दिली. तर पालखी इंदापूर गावात जाणार की नाही, याचा निर्णय पूर्णत: सोहळाप्रमुखांचा असेल. इंदापुरातील नागरिक, शहा विद्यालय, विश्वस्त यांची बोलणी सुरू आहे. त्यांचा जो निर्णय असेल त्याप्रणाणे प्रशासन तयारी करेल, अशी माहिती

हे सुद्धा वाचा

‘कचरा डेपोसंदर्भात दिल्या सूचना’

इंदापूरजवळच एक कचरा डेपो आहे. याठिकाणी नेहमीच आगीच्या घटना घडत असतात. याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. जे काही प्लास्टिक आहे, ते नष्ट करणार. त्याठिकाणी वास येणार नाही, आगीची घटना घडणार नाही, याचे नियोजन करत असल्याचेही जिल्हाधिकारी विजय देशमुख म्हणाले.