जमिनीच्या वाद झाला म्हणून सरपंचाला तोडले; लोकप्रतिनिधीच्या हत्येमुळे जिल्हा हादरला…

| Updated on: Apr 01, 2023 | 11:40 PM

जमिनीच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाची हत्या केली गेल्याने साऱ्या परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना पोलिसांना समजताच घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणात प्रथमदर्शनी तिघांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

जमिनीच्या वाद झाला म्हणून सरपंचाला तोडले; लोकप्रतिनिधीच्या हत्येमुळे जिल्हा हादरला...
Follow us on

मावळ/पुणे: जमिनीच्या वादातून पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एका सरपंचाची हत्या करण्यात आल्याने राजकीय वर्तुळासह परिसरात खळबळ माजली आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाची हत्या करण्यात आल्याने चर्चेला उधान आले. मावळ तालुक्यातील शिरगावमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे गावातही दहशत पसरली आहे. सरपंचाची हत्या झाल्यानंतर तात्काळ नेमकी हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे कुणाच्याही लक्षात आले नाही. ही घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

मावळ तालुक्यातील शिरगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंची निर्घृण हत्या झाल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या हल्यात ठार झालेलेल्या सरपंचाचे नाव प्रवीण गोपाळे अस आहे.

हत्या झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास चालू करून या प्रकरणात आणि कुणा कुणाचा समावेश आहे त्याचा शोध घेण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच असलेले प्रवीण गोपाळे यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून या घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रवीण गोपाळे यांची हत्या-शिरगावमधील साईबाबा मंदिरासमोर झाली झाली असूनही जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी अज्ञात तीन जणांनी येऊन कोयत्याने सपासप वार करत सरपंच प्रवीण गोपाळे यांची निर्घृण हत्या केल्याचे सांगण्यात आले आहे.

रात्री उशिरा ही घटना घडल्याने जमिनीच्या प्लॉटींगच्या वादातून ही हत्या झाली असल्याचा शिरगाव पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे आता पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणि कुणाचा समावेश आहे का त्याची चौकशी केली जात आहे.