पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक जिल्हा लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा वगळता दिवसभर सर्व बंद

| Updated on: Apr 06, 2021 | 11:03 AM

सातारा जिल्ह्यात दररोज 400 ते 500 च्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्यानं जिल्हा प्रशासनानं अशंत: लॉकडाऊन जाहीर केला आहे. Satara lockdown news

पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक जिल्हा लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा वगळता दिवसभर सर्व बंद
सांकेतिक फोटो
Follow us on

सातारा: कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्यानं राज्य सरकारनं शनिवार आणि रविवारी मिनी लॉकडाऊन जाहीर केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सातारा जिल्ह्यात दररोज 400 ते 500 च्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्यानं जिल्हा प्रशासनानं अशंत: लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर सातारा शहरातील व्यापाऱ्यांन या अंशत: लॉकडाऊनला विरोध केला आहे. शहरातील खणआळी परिसरात व्यापाऱ्यांकडून निदर्शनं करण्यात येत आहेत. (Satara lockdown news district administration declared partial lockdown due to corona virus outbreak)

सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते 6 फक्त अत्यावशक सेवा राहणार सुरु..

राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये रुग्णालये, निदान केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मेसियां, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा. किराणा सामान, भाजीपाला दुकाने, दुग्धशाळा, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने यांचा समावेश असेल. तर सार्वजनिक परिवहन सेवेतील ट्रेन, गाड्या, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस या देखील सुरु राहणार आहेत. स्थानिक प्राधिकरणांकडून किंवा शासनाकडून मान्सूनपूर्व कार्यवाहीची कामे, स्थानिक प्राधिकरणाव्दारे देण्यात येणा-या सर्व सार्वजनिक सेवा. वस्तूंची वाहतूक, कृषी संबंधित सेवा, या सेवा सुरु राहणार आहेत. ई- कॉमर्स, अधिकृत मीडिया, पेट्रोल पंप देखील सुरु राहणार आहेत.

शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत मिनी लॉकडाऊन

राज्य सरकारच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात देखील मिनी लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री 5 ते सोमवारी सकाळी 8 पर्यंत मिनी लॉकडाऊन लागू करण्यात येईल. हे नियम 30 एप्रिलपर्यंत सुरु राहतील.

व्यापारी संघटनेचा विरोध

सातारा जिल्हा प्रशासनानं लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनला सातारा शहरातील व्यापारी संघटनेने विरोध केला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या खणआळी परिसरात लॉकडाऊनला विरोध करत निदर्शने केली आहेत. शहरातील दुकाने उघडण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांबाबत जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील नागरिकांना नियमांचे पालन करण्यास सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

Corona Cases and Lockdown News LIVE : पुणे शहरात कोरोना रुग्णांसाठी बेडची कमतरता

नियम न पाळणाऱ्यांना 50 हजारांचा दंड, दुसऱ्यांदा पुन्हा चूक केल्यास कार्यालये सील करणार, नवी मुंबईत प्रशासनाचे कठोर पावलं

(Satara lockdown news district administration declared partial lockdown due to corona virus outbreak)