The kashmir Files : ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमात काश्मीरमधली खोटी स्थिती दाखवली- शरद पवार

| Updated on: Jun 04, 2022 | 7:27 PM

'द काश्मीर फाईल्स' सिनेमावर शरद पवारांनी भाष्य केलंय. हा सिनेमा देशातील जनमानसाच्या मनावर वेगळा परिणाम करण्याच्या उद्देशाने तयार केला गेला. सिनेमात काश्मीरमधली खोटी स्थिती दाखवली गेली. असं शरद पवार म्हणालेत.

The kashmir Files  : द काश्मीर फाईल्स सिनेमात काश्मीरमधली खोटी स्थिती दाखवली- शरद पवार
Follow us on

मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ (The kashmir Files) हा सिनेमा प्रचंड गाजला त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. शिवाय या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगला गल्ला जमवला. पण या सिनेमावर संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या. काहींनी या सिनेमात जे दाखवलं गेलं ते सत्य असल्याचं म्हटलंय तर काहींनी खोटा इतिहास दाखवल्याचं म्हटलं. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या सिनेमावर भाष्य केलं. ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमात काश्मीरमधली खोटी स्थिती दाखवली, असं शरद पवार यांनी म्हटलंय. विशिष्ट उद्देश डोळ्या समोर ठेवून ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा तयार केला गेला, असं संजय राऊत म्हणालेत. पुण्यात आज शरद पवार आणि संजय राऊत यांची एकाच व्यासपीठावर मुलाखत पार पडली. त्यावेळी त्यांनी हे विधान केलंय.

शरद पवार काय म्हणाले?

‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमावर शरद पवारांनी भाष्य केलंय. हा सिनेमा देशातील जनमानसाच्या मनावर वेगळा परिणाम करण्याच्या उद्देशाने तयार केला गेला. सिनेमात काश्मीरमधली खोटी स्थिती दाखवली गेली. त्याच्यात काश्मीरी पंडितांची हत्या केल्याचं दाखवलं गेलंय. या काळात केंद्रात भाजपच्या समर्थनाचं सरकार होतं. आणि आज केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यांना संरक्षण देण्यासाठी भाजप वेगळ्या काही उपाय योजना करत नाही. पण अश्या सिनेमांच्या माध्यमातून खोटा इतिहास दाखवून लोकांची दिशाभूल केली जातेय. धर्माधर्मात तेढ निर्माण केला जातोयत, असं शरद पवार म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

संजय राऊतांचं अग्निहोत्रींना चॅलेंज

‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना चॅलेंज दिलं आहे. जर हिंमत असेल तर सध्याच्या परिस्थीतीवर ‘द काश्मीर फाईल्स’ बनवून दाखवा, असं राऊत म्हणाले आहेत.

शरद पवार यांनाही आताचं महाविकास आघाडी सरकार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत विचारलं असता, ‘जेव्हा क्रायसिस असतो आणि विशेषत: राजकीय क्रायसिस तयार होतो, त्यावेळेला बाळासाहेब असते तर त्यांनी काय केलं असतं, हा विचार डोक्यात येतो आणि जो क्रायसिस आहे त्याचं उत्तर सापडतं’, असं शरद पवार म्हणाले.