PM Modi Pune Visit : उद्धव ठाकरे अन् विरोधकांची विनंती धुडकावत शरद पवार मोदी यांच्या कार्यक्रमाला जाणार

PM Narendra Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहे. विरोधकांची मागणी धुडकवत शरद पवार मोदी यांच्या कार्यक्रमास जाणार आहेत. यावेळी पवार काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे.

PM Modi Pune Visit : उद्धव ठाकरे अन् विरोधकांची विनंती धुडकावत शरद पवार मोदी यांच्या कार्यक्रमाला जाणार
sharad pawar and narendra modi
| Updated on: Aug 01, 2023 | 10:22 AM

रणजित जाधव, पुणे | 1 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर येणार आहे. शरद पवार यांच्या हस्ते 11.45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. या समारंभास शरद पवार यांनी जाऊ नये, अशी विनंती विरोधकांनी त्यांना केली होती. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना यासंदर्भात संदेश पाठवला होता. परंतु शरद पवार नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमास जाणार आहे. त्यांनी उद्धव ठाकरे अन् इंडिया या आघाडीमधील इतर पक्षांची मागणी धुडकावली आहे.

शरद पवार निर्णयावर ठाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १०. ३० वाजता पुणे शहरात येणार आहेत. त्यांना मंगळवारी लोकमान्य टिळक पुरस्कार हा प्रदान करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला शरद पवार यांची उपस्थिती असणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच भाजप विरोधकांची मोट बांधली गेली. इंडिया (Indian National Developmental Inclusive Alliance) या आघाडीत २६ पक्ष एकत्र आले आहेत. त्यात शरद पवार यांचा पक्षही आहेत. यामुळे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी विनंती त्यांच्या मित्र पक्षांकडून करण्यात आलेली होती. उद्धव ठाकरे यांनी त्यांना यासंदर्भात संदेश पाठवला होता. परंतु शरद पवार या संपूर्ण समारंभामध्ये जाण्यास ठाम आहेत.

शरद पवार यांचा ताफा तयार

शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग येथील निवासस्थाना बाहेर त्यांचा ताफा तैनात आहे. शरद पवार हे एस पी कॉलेजच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमसाठी जाणार आहेत. आता या पुरस्कार समारंभामध्ये शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय बोलणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील भ्रष्टाचारासंदर्भात मोदी बोलले होते. त्यानंतर प्रथमच दोन्ही नेते एकत्र एका व्यासपीठावर येत आहे. यावेळी पवार काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

विरोधकांचे आंदोलन

शरद पवार मोदी यांच्या कार्यक्रमासाठी जात आहे. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. मंडई परिसरात मोदी यांच्या दौऱ्यास विरोध करत आंदोलन केले जात आहे. पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन अन् विरोधकांचे आंदोलन सुरु असल्यामुळे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.