Pune Municipal elections: शिंदेसेनेचे आता पुणे महानगरपालिका लक्ष ; भाजप- सेना युती लढणारा महापालिका निवडणूक?

| Updated on: Jul 13, 2022 | 1:38 PM

बंडखोर शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच वातावरण पालटले. याची सुरुवात शिवसेनेचे माजी नेते विजय शिवतारे यांनी उघडपणे केली. त्यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन देत त्यांच्या शपथविधीला हजर राहून केली. एवढेच नव्हे तर शिवसेनाप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेमके काय चुकले? याची यादीच त्यांनी वाचून दाखवली.

Pune Municipal elections: शिंदेसेनेचे आता पुणे महानगरपालिका लक्ष ; भाजप- सेना युती लढणारा महापालिका निवडणूक?
Eknath Shinde
Image Credit source: Tv9
Follow us on

पुणे- राज्यात नव्याने उदयास आलेल्या सत्तांतरानंतर राज्यातील राजकारणाचे चित्र पालटले आहे. राज्यात घडलेल्या या सत्तांतरानंतर सर्वांचे लक्ष लागले ते महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये (Municipal elections)पुण्यात सेनेतून बाहेर पडलेला एकनाथ शिंदे गट (Ekanath Shinde )सक्रिय राहणार असल्याचे दिसून आले आहे. यातच बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्यातील शिवसेनेचे बुरुज ढासळू लागले आहे,  एकनाथ शिंदे यांना वाढता प्रतिसाद बघता पुण्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीतही शिंदे गट उत्तरास उतरणार असल्याचे नक्की झाले आहे. पुण्यातील राष्ट्रवादीला (NCP)तगडा शह देण्यासाठी शिंदे गट महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती करून निवडणूक लढवणार आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील सत्तांतर तसेच शिवसेनेच्या आमदारांनी केलेली बंडखोरी याचा परिणाम वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होताना दिसून आलाहोता. मात्र या सगळ्यांमध्ये पुणे जिल्ह्यात मात्र शिवसेनेचा आमदार नसल्याने काहीशी शांतता पाहायला मिळत होती.

आंदोलनापुरताच राहिला विरोध

एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडेमारत आंदोलन केले. त्यांचा निषेधही व्यक्त केला होता. मात्र बंडखोर शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच वातावरण पालटले. याची सुरुवात शिवसेनेचे माजी नेते विजय शिवतारे यांनी उघडपणे केली. त्यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन देत त्यांच्या शपथविधीला हजर राहून केली. एवढेच नव्हे तर शिवसेनाप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेमके काय चुकले? याची यादीच त्यांनी वाचून दाखवली. यानंतर मात्र पुण्यातील हालचालींना वेग आला. पुढे हडपसर मधील माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हडपसर येथे जाहीर जंगी स्वागत केले. यावेळी शहर प्रमुख अजय भोसले युवा सेनेचे प्रदेश सहसचिव किरण साळी यांनीही आम्ही एकनाथ शिंदे बरोबर जात असल्याचे जाहीररीत्या सांगितले. यामध्ये साळी हे शिंदे गटातील आमदार व माजी मंत्री उदय सामंत यांच्या कट्टर समर्थक आहेत. याबरोबरच भानगिरे यांच्या सोबतच आणखी काही माजी नगरसेवक शिंदे गटाला जाऊन मिळण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा शिंदे गट सक्रिय झालेला पाहायला मिळणार आहे.

काय साध्य होणार

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती झालेतर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकताना दिसून येईल. या निवडणुकीत सेनेच्या काही जागा लढवणार आहेत.

हे सुद्धा वाचा