AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

shirdi sai baba temple : शिर्डी साई मंदिराच्या सुरक्षेत महत्वाचा बदल, आता कोण देणार सुरक्षा?

shirdi sai baba temple : शिर्डी येथील साई मंदिराच्या सुरक्षेवरुन ग्रामस्थ आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरु झाला आहे. मंदिरासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयास शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता नवीन सुरक्षा मिळाली आहे.

shirdi sai baba temple : शिर्डी साई मंदिराच्या सुरक्षेत महत्वाचा बदल, आता कोण देणार सुरक्षा?
shirdi sai baba
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 01, 2023 | 3:46 PM
Share

मनोज गाडेकर, अहमदनगर : तिरुपती येथील मंदिरानंतर शिर्डीतील साई मंदिर दुसऱ्या क्रमांकाचे भारतातील श्रीमंत देवस्थान आहे. या मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविकांची मांदियाळी असते. लाखो भाविक शिर्डीतील साई बाबांच्या चरणी लीन होतात. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिरातील सुरक्षासंदर्भात मध्यतंरी मोठा वाद निर्माण झाला होता. हे मंदिर उडवून देण्याची धमकी मिळाली होती. यामुळे केंद्र सरकारने सीआरपीएफची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याला ग्रामस्थांनी विरोध केला होता अन् बेमुदत शिर्डी बंदही पुकारले होते.

आता काय केला बदल

सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत शिर्डी साईबाबा संस्थानला केंद्रीय सुरक्षा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर साईबाबा संस्थानने सीआरपीएफची सुरक्षा देण्याची तयारी दाखवलीय. परंतु या निर्णयास ग्रामस्थांनी विरोध केला. यामुळे केंद्र सरकारने आपला निर्णय बदलला. आता मंदिराला शनिवारपासून नवीन सुरक्षा मिळाली आहे. ही सुरक्षा महाराष्ट्र सुरक्षा बदलाची आहे.

आता कोणाकडे आली सुरक्षा

महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) ही राज्य सरकारची सुरक्षा संस्था आहे. 2010 मध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा निगम अधिनियमानुसार एमएसएफची निर्मिती केली गेली. एमएसएफ राज्य सरकार, केंद्र सरकारची राज्यातील कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम याठिकाणी सुरक्षा देते. हीच सुरक्षा शिर्डीच्या साई मंदिराला देण्यात आली आहे. शनिवारी MSF जवान साई मंदिरात पोहचले. २० ते २५ जणांची पहिली तुकडी मंदिर परिसरात दाखल झाली आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी ७० ते ७५ जवानांची होणार नियुक्ती करण्यात येणार आहे. साईमंदिराला यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा होती. तिच्याऐवजी आता MSF जवान करणार साई मंदिराची सुरक्षा करणार आहे.

नागरिकांचा होता विरोध

शिर्डीकरांनी केंद्राच्या CISF नियुक्तीला विरोध केला होता. त्यासाठी १ मे रोजी बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी हा निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकारने निर्णय मागे घेतला. त्यानंतर शिर्डीकरांनी बेमुदत बंद मागे घेतला.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत