Pune crime |धक्कादायक ! पुण्यातन गुंडांच्या टोळक्याकडून अल्पवयीन मुलावर गोळीबार

टोळक्याने दोघांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्यास ससुरुवात केली. मारहाण सुरु असतानाच एकाने पिस्तूल काढत अल्पवयीन ,मुलावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील रहिवाशी जमा झाले,मात्र गुंडानी रहिवाश्यानाही शिवीगाळ करतादमदाटी केली , त्यांना विटा फेकून मारत घटना स्थळावरून पलायन केले.

Pune crime |धक्कादायक ! पुण्यातन गुंडांच्या टोळक्याकडून अल्पवयीन मुलावर गोळीबार
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 4:48 PM

पुणे – पुण्यात अल्पवयीन गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्व वैमनस्यांतून गुंडांच्या टोळक्याने कोथरूड(kothrud) परिसरत अल्पवयीन युवकांवर (minor youth )हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच शिवणेमध्येही (Shivane)अल्पवयीन मुलावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार मुलगा व त्याचा मित्र गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मित्राच्या वाढदिवसाठी निघाले होते. वारजे भागातील रामा नागर परिसरात अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्राला गुंडांच्या टोळक्याने अडवले. टोळक्याने दोघांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्यास ससुरुवात केली. मारहाण सुरु असतानाच एकाने पिस्तूल काढत अल्पवयीन ,मुलावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील रहिवाशी जमा झाले,मात्र गुंडानी रहिवाश्यानाही शिवीगाळ करतादमदाटी केली , त्यांना विटा फेकून मारत घटना स्थळावरून पलायन केले. याप्रकरणी पोलिसांनी सहा गुंडांवर गुन्हा दाखल केला आहे. या गोळेबरच्या घटनेतून अल्पवयीन मुलगा बचावला आहे पोलीस आरोपीच शोध घेत आहेत. घटना स्थळावरून पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

धारदार शस्त्राने  वार
दुसरीकडं वडिलांच्या दशक्रियाविधीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी चारचाकीमध्ये निघालेल्या माजी सैनिकाने रस्त्यावर असलेली दुचाकी बाजूस काढण्यास सांगितल्याचा राग मनात धरत त्याच्यावर धारदार शस्त्राने  वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीनिवास नानासाहेब जगताप (वय 30, रा. माळीमळा, महात्मा फुले नगर, लोणी काळभोर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत फिर्यादीवरून गणेश भोसले, अभिजीत उर्फ दिगंबर पवार, ओम लिंगरे, साहिल बारसकर, गौरव धांदे, ॠषिकेश पाटोळे, सोन्या गायकवाड, अमित सोनवणे, विशाल आण्णासाहेब जाधव, राम म्हस्के, ओंकार जोगदंड व इतरांचे विरोधात दहशत निर्माण करीत कोयते उंचाविणे, कोयते मारण्याचे भय दाखविणे, जिवे ठार मारण्याच्या उददेशाने कोयता हत्यारांनी मारहाण करुन जखमी करणे या कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jitendra Awhad : ’10 बाय 10च्या घरात राहलोय, सार्वजनिक संडास मी पण वापरलाय’ असं जितेंद्र आव्हाड कुणाला म्हणाले?

Travel Special: हरिद्वारला जाण्याचा प्लॅन आहे? मग या हिल स्टेशनला आवश्य भेट द्या

Mumbai Fire: आग कशी विझवायची? मुंबई महापालिका देणार धडे; बीएमसीचे वरातीमागून घोडे