AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad : ’10 बाय 10च्या घरात राहलोय, सार्वजनिक संडास मी पण वापरलाय’ असं जितेंद्र आव्हाड कुणाला म्हणाले?

पन्नास वर्षे राहिलेल्या माणसाला घर (House) खाली करायला सांगता हे योग्य नाही. रेल्वे विस्तारीकरण होत असते तर मान्य होते मात्र केंद्र सरकारच्या (Central Government) जागेवर असलेल्या जागा खाली करायला सांगितले जात आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यानी केंद्र सरकारवर केला आहे.

Jitendra Awhad : '10 बाय 10च्या घरात राहलोय, सार्वजनिक संडास मी पण वापरलाय' असं जितेंद्र आव्हाड कुणाला म्हणाले?
घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाहीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 4:39 PM
Share

ठाणे : ठाण्यातल्या झोपडपट्ट्यांवरून मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच आक्रमक झाले आहेत. पन्नास वर्षे राहिलेल्या माणसाला घर (House) खाली करायला सांगता हे योग्य नाही. रेल्वे विस्तारीकरण होत असते तर मान्य होते मात्र केंद्र सरकारच्या (Central Government) जागेवर असलेल्या जागा खाली करायला सांगितले जात आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यानी केंद्र सरकारवर केला आहे. तसेच कळव्यात अशाच पद्धतीने घर पाडण्यात येणार होती ती आम्ही पाडू दिली नाहीक आज त्या झोपड्या तशाच आहेत, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. कळवा आणि मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात झोपटपट्टी आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडही विधानसभेत मुंब्र्याचे प्रतिनिधीत्व करतात, त्यामुळे तिथल्या घरांवरून जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

केंद्र सरकार इतके निर्दयी कसे?

केंद्र सरकार इतके निर्दयी कसे काय असू शकते? असा सवालही आव्हाड यानी उपस्थित केला आहे. तसेच भाजपचे हे ठरलेलं आहे की सर्वांना घाबरवून सोडायचं. निवडणूक आल्या की सांगायला येतील की आम्ही झोपड्या तोडू देणार नाही, अशी घणाघाती टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर केली आहे. या लढ्याचे नेतृत्व मी करणार आहे, मुख्यमंत्री यांना आत मध्यस्थी करावी लागेल असेही आव्हाड म्हणाले आहेत.

बापाचं राज्य आहे का?

सर्व कागदपत्रे असताना घराच्या बाहेर जायला सांगत आहेत, यांच्या बापाचं राज्य आहे का? असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. तसेच महाराष्ट्र सरकारचा न्याय आहे की झोपडपट्या ना संरक्षण मिळायला हवे. मर जायेंगे ,जान दे देंगे घर नही देंगे, राष्ट्रवादी सर्वांना साथ देईल असा नाराही जितेंद्र आव्हाड यानी दिला आहे. बाजूला रेल्वे ट्रॅक आहे, मी येऊन गेल्यानंतर बाकी नेते येतील, आता सर्व मोठे नेते लाईनने येतील, असा टोलाही त्यानी लगावला आहे. हा रेल्वे ट्रॅक बंद झाला तर अख्खा भारत बंद होतो. मी 10 बाय 10 च्या घरात राहून आलोय. सार्वजनिक संडासाचा वापर मी देखील केलाय, जो डर गया वो मर गया, घाबरू नका घर तुटणार नाही असे आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.

Mumbai Fire : कमला इमारतीच्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 23 जखमी, संपूर्ण यादी एका क्लिकवर

Surekha Punekar | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी !

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी सुरू!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.