Mumbai Fire : कमला इमारतीच्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 23 जखमी, संपूर्ण यादी एका क्लिकवर

Mumbai Fire : कमला इमारतीच्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 23 जखमी, संपूर्ण यादी एका क्लिकवर
कमला इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिका उपायुक्तांची चौकशी समिती स्थापन

मुंबईतील (Mumbai) नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला (Kamla Building Fire) इमारतीला लागलेल्या आगीत आतापर्यंत आलेल्या माहितीनुासर 6 जणांचा मृत्यू झालेला आहे.

गोविंद ठाकूर

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 22, 2022 | 1:30 PM

मुंबई: मुंबईतील (Mumbai) नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला (Kamla Building Fire) इमारतीला लागलेल्या आगीत आतापर्यंत आलेल्या माहितीनुासर 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. जखमींना नायर रुग्णालय, भाटिया रुग्णालय (Bhatia Hospital) आणि कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आतापर्यंत 29 जण या आगीच्या तडाख्यात सापडल्याचं समोर आलं आहे. नायर रुग्णालयात दाखल केलेल्या पाच जणांचा मृत्यू झालाय. तर, कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. सहा पैकी तिघांची ओळख पटलेली नाही तर हितेश मिस्त्री, मंजूबने कंथारिया आणि पुरुषोत्तम चोपडेकर यांचा मृत्यू झालाय. तर, काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. तर, काही जणांना प्राथमिक उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. या ठिकाणी लागलेली आग ही लेवल 3 स्वरूपाची होती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. कमला इमारत 20 मजल्यांची असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली होती.

संपूर्ण यादी

अ.क्र.नाव रुग्णालयाचं नावस्थिती
1माधुरी चौहाह कस्तुरबा रुग्णालय माहिती येणं बाकी
2अज्ञात (महिला )कस्तुरबा रुग्णालय मृत्यू
3धवलमनिषा माहिती येणं बाकी
4हंस चोक्सी भाटिया रुग्णालयगंभीर
5फाल्गुनी चोक्सी भाटिया रुग्णालयस्थिर
6यश चोक्सीभाटिया रुग्णालयस्थिर
7शुभांगी सालकर भाटिया रुग्णालयगंंभीर
8दिलीप सालकर भाटिया रुग्णालयगंभीर
9ममता सालकरभाटिया रुग्णालयगंभीर
10तनिषा सावंत भाटिया रुग्णालयस्थिर
11अंकिता चौधरी भाटिया रुग्णालयस्थिर
12धनपत पंडित भाटिया रुग्णालयगंभीर
13गोपाल चोपडेकर भाटिया रुग्णालयस्थिर
14स्नेहा चोपडेकर भाटिया रुग्णालयस्थिर
15वेदांगी चोपडेकरभाटिया रुग्णालयस्थिर
16मीना चौहानभाटिया रुग्णालयउपचारानंतर डिस्चार्ज
17प्रतिमा नाईक भाटिया रुग्णालयउपचारानंतर डिस्चार्ज
18कल्पना नाडकर्णी भाटिया रुग्णालयउपचारानंतर डिस्चार्ज
19स्मिता नाडकर्णी भाटिया रुग्णालयउपचारानंतर डिस्चार्ज
20रुदय चोपडेकर भाटिया रुग्णालयउपचारानंतर डिस्चार्ज
21मनिष सिंग नायर रुग्णालयरुग्णालयात दाखल
22मंजू खन्ना नायर रुग्णालयरुग्णालयात दाखल
23अज्ञात नायर रुग्णालयमृत्यू्
24अज्ञात (महिला )नायर रुग्णालयमृत्यू
25हितेश मिस्त्री नायर रुग्णालयमृत्यू
26मंजूबेन कंथारियानायर रुग्णालयमृत्यू
27पुरुषोत्तम चोपडेकर नायर रुग्णालयमृत्यू (भाटियातून दाखल)
28अंधुरी भोला रिलायन्स रुग्णालयडीएमडीए डिस्चार्ज
29माधुुरी भंडारी वोकहार्ट रुग्णालय उपचारानंतर डिस्चार्ज

आगीत सहा जणांचा मृत्यू

नाना चौक गवालिया टँक येथील कमला इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झालाय. नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पाच जणांचा मृत्यू झालाय. तर, कस्तुरबामध्ये दाखल केलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.आगीत जखमी झालेल्या व्यक्तींना बड्या रुग्णालयांनी कोरोनाचं काण देत दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचं देखील समोर आलं आहे. कमला इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी 13 फायर इंजिन घटनास्थळी दाखल असून सात जंम्बो टॅंकर आग विझवण्यासाठी दाखल झाले होते. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून किती नुकसान झालंय याची माहिती मिळालेली नाही.

कमला इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग

मुंबईतील नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला आग लागलीय. सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. कमला इमारत 20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली होती. सकाळी सुमारास साडेसातच्या सुमारास आग लागली असून आग लेव्हल 3 ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

घटनास्थळी 13 फायर इंजिन

आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती आहे.

इतर बातम्या:

Mumbai Fire : भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला आग, 6 जणांचा मृत्यू, 15 जखमी

Mumbai Fire : मुंबईतील भाटिया रुग्णालयाजवळील इमारतीला आग, 15 जण जखमी; अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु

Mumbai level Kamala building fire six died five Nair Hospital and one in Kasturba injured admitted in Bhatia hospital

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें