Mumbai Fire : भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला आग, 7 जणांचा मृत्यू, 15 जखमी

Mumbai Fire : भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला आग, 7 जणांचा मृत्यू, 15 जखमी
Mumbai Kamala Building fire

नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी लागलेली आग ही लेवल 3 स्वरूपाची होती.

विनायक डावरुंग

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 22, 2022 | 11:24 AM

मुंबई: मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये (BMC) गेल्या काही दिवसांपासून इमारतींना आग (Fire Borke Out) लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे. नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला लागलेल्या आगीत  7  जणांचा  मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नायर रुग्णालयात 5, कस्तुरबा रुग्णालयात 1 आणि भाटिया रुग्णालयात 1 एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कमला इमारतीला लागलेली आग ही लेवल 3 स्वरूपाची होती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. कमला इमारत 20 मजल्यांची असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या आगीच्या घटनेत 15 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमला इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी 13 फायर इंजिन घटनास्थळी दाखल असून सात जंम्बो टॅंकर आग विझवण्यासाठी दाखल झाले होते. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून किती नुकसान झालंय याची माहिती मिळालेली नाही. महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.

आगीत तिघांचा मृत्यू, 15 जण जखमी

नाना चौक गवालिया टँक येथील कमला इमारतीला लागलेल्या आगीत 15 जण जखमी झाले आहेत. भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 15 जणांपाकी 12 जणांना जनरल वार्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर, आय़सीयूमध्ये तिघांना दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी पैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. कस्तुरबा रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.

कमला इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग

मुंबईतील नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला आग लागलीय. सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. कमला इमारत 20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागलीय. सकाळी सुमारास साडेसातच्या सुमारास आग लागली असून आग लेव्हल 3 ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

घटनास्थळी 13 फायर इंजिन

आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती आहे.

इतर बातम्या:

Mumbai Fire : मुंबईतील भाटिया रुग्णालयाजवळील इमारतीला आग, 15 जण जखमी; अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा शिवसैनिंकाशी ऑनलाईन संवाद, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन

Mumbai level 3 fire broke out in 20 storeys Kamala building near Bhatia hospital in Tardeo two died 15 admitted hospital

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें