Shri Dehu Temple closed| श्री देहू मंदिर मकर संक्रांतीला 15 तास बंद राहणार; जाणून घ्या नेमकं कोणत्या वेळी बंद राहणार

| Updated on: Jan 12, 2022 | 11:14 AM

मकर संक्रातीच्या दिवशी पुणे जिल्ह्यासहामहाराष्ट्राच्या विविध भागातून महिला विठ्ठल रुक्मिणी आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांना ओवसा वाहण्यासाठी देहू मध्ये दाखल होतात. मात्र मागील दोन वर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळं सर्व देवस्थाने बंद होती. त्यामुळे सॅण उत्सवही मोठ्याप्रमाणात साजरे करता आलेले नाहीत.

Shri Dehu Temple closed|  श्री देहू मंदिर मकर संक्रांतीला 15 तास बंद राहणार; जाणून घ्या नेमकं कोणत्या वेळी बंद राहणार
Dehu Temple
Follow us on

पुणे – वाढत्या कोरोनाच्या संकटामुळं जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम कठोर कारण्याबरोबच कडक निर्बंधही लावाले आहेत. ओमिक्रोन व कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत जिल्ह्यातील पर्यटनस्थळे (Tourist Places) बंद करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यानंतर मकर संक्रातीच्या(Makar  sankranti)  निमिताने देहूतील (Dehu Temple )विठ्ठल रुक्मिणी आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी 14 जानेवारी मकर संक्रातीला मंदिर बंद ठेवण्याचादेवस्थान प्रशासनानं घेतला आहे. 14 जानेवारीच्या पहाटे 5 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली आहे.

महिलांची गर्दी रोखण्यासाठी नियोजन
मकर संक्रातीच्या दिवशी पुणे जिल्ह्यासहामहाराष्ट्राच्या विविध भागातून महिला विठ्ठल रुक्मिणी आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांना ओवसा वाहण्यासाठी देहू मध्ये दाखल होतात. मात्र मागील दोन वर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळं सर्व देवस्थाने बंद होती. त्यामुळे सॅण उत्सवही मोठ्याप्रमाणात साजरे करता आलेले नाहीत. यंदा कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानेतसेच मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने महिलावर्ग मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोनाच्या विषाणूंचा प्रसार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे देवस्थान प्रशासनान हा निर्णय घेतला आहे.

नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची गरज
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जनजीवन पुन्हा पूर्व पदावर येत असतानाच ओमिक्रॉनच्या नवीन विषाणूंच्या डोकेवर काढले. दिवसेंदिवस याची रुग्णसंख्या वाढतच आहे. या विषाणूंचे कम्युनिटी स्प्रेडींग सुरु झाले आहे. अश्यातच सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीला आळा घातला नाहीत तर येत्या काळात रुग्णसंख्येची गंभीर परिस्थिती पाहायला मिळेल अशी भीती वैद्यकीय तज्ञ व्यक्त केली आहे. त्यामुळे शहर परिसरातील गर्दीला निर्णय घेण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

Solapur जिल्ह्यातील Siddheshwar Maharaj यात्रेला सुरुवात, Coronaच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध

Corona Effect : कोरोना निर्बंधाचे परिणाम पोल्ट्री व्यवसयावर, मागणीतही घट

Makar Sankranti 2022 | सूर्य आणि शनी येणार आमने- सामने , तयार होणार दुर्मिळ योग, जाणून घ्या राशींवर त्याचा काय परिणाम होणार