Solapur जिल्ह्यातील Siddheshwar Maharaj यात्रेला सुरुवात, Coronaच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालीय. एकूण चार दिवस चालणाऱ्या यात्रेच्या आजच्या पहिल्या दिवशी 68 लिंगाना तैलाभिषेक करुन यात्रेला सुरुवात होतेय. यात्रेचे मुख्य मानकरी असलेले हिरेहब्बू कुटुंबीय योगदंड घेऊन मंदिराकडे रवाना होतात.

सोलापूर : ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालीय. एकूण चार दिवस चालणाऱ्या यात्रेच्या आजच्या पहिल्या दिवशी 68 लिंगाना तैलाभिषेक करुन यात्रेला सुरुवात होतेय. यात्रेचे मुख्य मानकरी असलेले हिरेहब्बू कुटुंबीय योगदंड घेऊन मंदिराकडे रवाना होतात. दरवर्षी पायी चालत हातात नंदीध्वज घेऊन नगरप्रदक्षिणा घातली जाते. मात्र कोरोनामुळे यंदाच्या वर्षी यात्रेवर मोठ्याप्रमाणात निर्बंध घालण्यात आलेत. त्यामुळे पायी नंदीध्वज मिरवणुक काढण्यास प्रशासनाने मनाई केलीय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI