AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तेव्हा कोणी तयार नव्हतं आणि आता 27 देशांसोबत ट्रेड डील, मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

राज्यसभेत बोलताना ट्रेड डीलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे, त्यांनी देशाला अशा स्थितीमध्ये पोहोचवलं होतं, की त्यावेळी कोणताही देश भारतासोबत ट्रेड डील करण्यास तयार नव्हता, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

...तेव्हा कोणी तयार नव्हतं आणि आता 27 देशांसोबत ट्रेड डील, मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 05, 2026 | 7:14 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर भाषण केले, यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना मोदी यांनी म्हटलं आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये भारताचा विकास प्रचंड झपाट्यानं झाला आहे. हा कालखंड समाजातील प्रत्येक वर्गामध्ये झालेल्या सकारात्मक बदलाचा साक्षीदार बनला आहे. देश हा योग्य दिशेनं खूप वेगानं पुढे सरकत आहे. भारतानं 9 बड्या देशांसोबत ट्रेड डील केली आहे, त्यामध्ये मदर ऑफ ऑल डीलचा देखील समावेश आहे, या माध्यमातून भारतानं एकाचवेळी 27 देशांसोबत ट्रेड डील केल्याचं यावेळी बोलताना मोदी यांनी म्हटलं आहे.

ट्रेड डीलवर काय म्हणाले मोदी?

राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की आज भारत उद्याच्या भविष्यासाठी अनेक देशांसोबत ट्रेड डील करत आहे. नुकतीच आपण जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेसोबत ट्रेड डील केली आहे, आपण युरोपियन यूनियन सोबत देखील ट्रेड डील केली आहे. या ट्रेड डीलमध्ये जगातील 27 देशांचा समावेश आहे, असं यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसवर हल्लाबोल

दरम्यान यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व ट्रेड डीलवरून काँग्रेसवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. जे लोक थकलेले आहेत, निराश आहेत. त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की त्यांनी देशाला अशा स्थितीमध्ये पोहोचवलं होतं की, जगातील कोणताही देश भारतासोबत ट्रेड डील करण्यास तयार नव्हता. तुम्ही प्रयत्न केला असेल, खूप प्रयत्न केला असेल मात्र त्यावेळी भारतासोबत कोणत्याही देशानं ट्रेड डील केली नाही, असा हल्लाबोल यावेळी मोदींनी काँग्रेसवर केला आहे.

विरोधकांची घोषणाबाजी 

दरम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरु असतानाच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचं पहायला मिळालं. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली, त्यानंतर संसदेमधून विरोधकांनी वॉकआऊट केलं. त्यावरून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं.

Follow Us
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?.
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स.
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ.