AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळश्या, हंडे, बादल्या आताच भरून ठेवा! दक्षिण मुंबईत दोन दिवस पाणीबाणी, महापालिकेचं आवाहन काय?

मुंबईकरांनो 15 तारखेला घरातील पाण्याचा साठा वाढवा. दोन दिवस पाणी येणार नसल्यामुळे पाणी जपून वापरा. आता कोणत्या कोणत्या भागांमध्ये दोन दिवस पाणी येणार नाही? चला जाणून घेऊया...

कळश्या, हंडे, बादल्या आताच भरून ठेवा! दक्षिण मुंबईत दोन दिवस पाणीबाणी, महापालिकेचं आवाहन काय?
water cut in mumbaiImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 12, 2026 | 8:30 AM
Share

दक्षिण मुंबईतील नागरिकांना येत्या १६ आणि १७ एप्रिल रोजी पाणीपुरवठ्यात मोठी अडचण येणार आहे. मुंबई महानगरपालिके (बीएमसी)ने मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामासाठी १८ तासांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो 15 तारखेला घरातील पाण्याचा साठा वाढवा. दोन दिवस पाणी येणार नसल्यामुळे पाणी जपून वापरा. आता कोणत्या कोणत्या भागांमध्ये दोन दिवस पाणी येणार नाही? चला जाणून घेऊया…

या पाणी कपातीचा परिणाम A, B, C, E आणि F-South विभागांतील अनेक भागांवर होणार असून, परळ, लालबाग, दादर, भायखळा आणि कुलाबा परिसरातील नागरिकांना काही काळ पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कधी आणि किती वेळ बंद?

बीएमसीच्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून १७ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत म्हणजे सुमारे १८ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, झडप बदलणे आणि इतर तांत्रिक तपासणीची महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत.

बीएमसीचे आवाहन

बीएमसी प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, ते आधीच पुरेसे पाणी साठवून ठेवावे. पाण्याचा जपून वापर करावा आणि अनावश्यक वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल.

का घेतला निर्णय?

ही पाणी कपात मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामासाठी आवश्यक असल्याचे बीएमसीने सांगितले आहे. नियमित देखभाल कामांमुळे पाणीपुरवठा प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि सुरळीत होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

नागरिकांना सल्ला:

-१५ एप्रिलपर्यंत घरात पुरेसे पाणी साठवून ठेवा

-पाण्याचा मिती वापर करा

-दुरुस्ती काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल याची नोंद घ्या

Follow Us
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...