AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...

Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून…

| Updated on: Jul 12, 2026 | 5:34 PM
Share

कल्याण पश्चिमेतील घोलप नगर परिसरात रविवारी दुपारी री-डेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी सुमारे 2 वाजून 5 मिनिटांनी ही घटना घडली असून, इमारतीचा मोठा भाग थेट रस्त्यावर कोसळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाडकाम सुरू असताना इमारतीचा मोठा भाग अचानक ढासळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, इमारतीलगत राहणाऱ्या मोरे कुटुंबाने वेळेवर धोका ओळखत आपल्या घरातील स्वयंपाकघराच्या खिडकीतून उडी मारून जीव वाचवला. मात्र, या दुर्घटनेत त्यांच्या घराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेदरम्यान वीज पुरवठ्याच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. त्या वेळी परिसरात लहान मुले खेळत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

स्थानिक नागरिकांनी पाडकामादरम्यान पुरेशा सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप केला आहे. विकासकाच्या कथित हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Published on: Jul 12, 2026 05:34 PM

Follow Us