एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे…
काही आठवड्यांपूर्वी मुंबई लोकलमध्ये मयंक लोहार या तरुणाच्या मृत्यूच्या घटनेने राज्यभरात मोठी चर्चा निर्माण झाली होती. हे प्रकरण अद्याप चर्चेत असतानाच नवी मुंबईतील नेरुळ परिसरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
काही आठवड्यांपूर्वी मुंबई लोकलमध्ये मयंक लोहार या तरुणाच्या मृत्यूच्या घटनेने राज्यभरात मोठी चर्चा निर्माण झाली होती. हे प्रकरण अद्याप चर्चेत असतानाच नवी मुंबईतील नेरुळ परिसरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात एक तरुण मद्यधुंद अवस्थेत नागरिकांना शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. संबंधित तरुणाच्या हातात लोखंडी सुरा असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अजमल अब्दुल मुस्तफा शेख असे या तरुणाचे नाव असून तो मद्यपान करून स्थानक परिसरात गोंधळ घालत असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर नेरुळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.
पोलीस घटनास्थळी आल्यानंतर संबंधित तरुणाने पोलिसांसमोरच चाकू बाहेर काढला अन् एकच खळबळ उडाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नेरुळ पोलीस पुढील तपास करत आहेत.
Published on: Jul 12, 2026 07:10 PM
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच

