Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
राज्यातील पावसाने जोर धरताच बुलढाण्याच्या निसर्गसौंदर्याला पुन्हा एकदा बहर आला आहे. सह्याद्री आणि अजिंठा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले, इंग्रजकालीन थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे बुलढाणा सध्या हिरवाईने नटले असून, पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात बुलढाण्याचे तापमान तब्बल ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसानंतर संपूर्ण परिसराचे रूपच पालटले आहे. बुलढाणा शहरालगतच्या सह्याद्री आणि अजिंठा पर्वतरांगांनी जणू हिरवा शालू पांघरल्याचे मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे.
पावसामुळे वातावरणातही सुखद गारवा निर्माण झाला असून, निसर्गरम्य आणि अल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले बुलढाण्याकडे वळू लागली आहेत. हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, धुक्याची चादर आणि प्रसन्न वातावरणामुळे परिसरात पर्यटनाला चालना मिळत आहे.
दरम्यान, पावसामुळे बहरलेल्या बुलढाण्याच्या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी स्थानिकांसह बाहेरगावचे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असून, येत्या काही दिवसांत पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Jul 12, 2026 06:25 PM
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,