AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम असं का म्हणाले?

या मुलाखतीत संजय दत्त 1993 सली झालेले बॉम्बस्फोट रोखू शकला असता का? असा प्रश्न उज्ज्वल निकम यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर उज्ज्वल निकम यांनी दिले आहे.

संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम असं का म्हणाले?
ujjwal nikam and sanjay duttImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 12, 2026 | 10:08 PM
Share

Sanjay Dutt : बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव सध्या आपल्या प्रहार या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव याने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. एकीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे वरिष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांनी 1993 सली झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोटांवर महत्त्वाचे असे केले आहे. तसेच त्यांनी अभिनेता संजय दत्त याच्याविषयीही महत्त्वाचं विधान केलं आहे. उज्वल निकम यांनी द लल्लनटॉपला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी 1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोटाविषयी तसेच त्याकाळी संजय दत्तवर झालेल्या आरोपांविषयी मत व्यक्त केले आहे. उज्ज्वल निकम यांच्या मतानुसार संजय दत्तने त्याच वेळी समजदारी दाखवली असती, तर मुंबईमध्ये झालेले बॉम्बस्फोट रोखले गेले असते. शेकडे लोकांचा प्राण वाचला असता.

उज्ज्वल निकम नेमका काय म्हणाले?

या मुलाखतीत संजय दत्त 1993 सली झालेले बॉम्बस्फोट रोखू शकला असता का? असा प्रश्न उज्ज्वल निकम यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना उज्ज्वल निकम म्हणाले की, बॉम्बस्फोट होण्याआधी अबू सालेम एका टेम्पोमध्ये मोठे शस्त्र घेऊन आला होता. या शस्त्रांमध्ये अनेक हँड ग्रेनेड, एके-47 रायफल यांचा समावेश होता. संजय दत्तने यापैकी काही शस्त्र आपल्याजवळ ठेवले होते. यातील हॅन्ड ग्रेनेड नंतर त्याने परत केले होते, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी यावेळी दिली.

पोलिसांनी कातडीने कारवाई केली असती

तसेच पुढे बोलताना संजय दत्तला या शस्त्रांविषयी माहिती होतं. हीच माहिती जर त्याने पोलिसांना दिली असती तर दृश्य वेगळे असते. पोलिसांनी कातडीने कारवाई केली असती आणि हे बॉम्बस्फोट रोखता आले असते. बॉम्बस्फोटाच्या कटामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांनाच अटक करता आलं असतं. पूर्ण कटाचा भंडाफोड झाला असता, असेही मत निकम यांनी व्यक्त केले आहे.

दहशतवादी हल्ला करणे हा संजय दत्तचा हेतू नव्हता

दरम्यान हा दावा करताना उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे सांगितलंय की संजय दत्त बॉम्बस्फोट रोखू शकला असता. संजय दत्त हा दहशतवादी नव्हता. दहशतवादी हल्ला करणे हा संजय दत्तचा हेतू नव्हता, असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow Us
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....