AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8000mAh बॅटरी असलेला हा स्वस्त टॅबलेट भारतात लाँच, ही आहे किंमत

Ai+ चा पहिला टॅबलेट भारतात लाँच झाला आहे. यामध्ये पॉवरफूल 8000mAh बॅटरी आणि MediaTek Helio G88 प्रोसेसर आहे. चला जाणून घेऊया की या टॅबलेटची किंमत किती असेल आणि त्यात कोणते फिचर्स आहेत.

8000mAh बॅटरी असलेला हा स्वस्त टॅबलेट भारतात लाँच, ही आहे  किंमत
tablet with 8000mAh battery
| Edited By: | Updated on: Apr 12, 2026 | 8:29 AM
Share

Ai+ चा पहिला Ai Plus Pulse Tab टॅबलेट भारतात लाँच करण्यात आला आहे. हा नवीन अँड्रॉइड टॅबलेट Ai+ Nova Flip 5G आणि Ai+ Nova 2 5G सिरीजमध्ये सामील झाला आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये दोन रंगांचे पर्याय, मोठी 8000 mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसर यांचा समावेश आहे, ज्यामुळे हा टॅबलेट फोन बजेट सेगमेंटमध्ये येतो. वाय-फाय आणि 4G LTE कनेक्टिव्हिटी असलेल्या या टॅबलेटमध्ये उत्कृष्ट आवाजासाठी क्वाड स्पीकर्स आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या टॅबलेटची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

या अँड्रॉइड टॅब्लेटच्या 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 9 हजार 999 रूपये निश्चित करण्यात आली आहे. या टॅब्लेटची विक्री पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात फ्लिपकार्टवर आणि निवडक रिटेल आउटलेट्सवर सुरू होईल. स्पर्धेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या किंमत श्रेणीमध्ये हा अँड्रॉइड टॅब्लेट रियलमी पॅड 2 लाइट, विवो Y90 आणि हुआवे मेटपॅड T8 सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो.

एआय प्लस पल्स टॅबची वैशिष्ट्ये

स्क्रीन: या टॅबमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 10.95-इंचाचा फुल एचडी रिझोल्यूशन डिस्प्ले आहे, जो 400 nits पर्यंतच्या कमाल ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

चिपसेट: या टॅबमध्ये ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ G88 चिपसेट वापरण्यात आला आहे.

रॅम आणि स्टोरेज: या अँड्रॉइड टॅबलेटमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा: या टॅबमध्ये 13-मेगापिक्सलचा मागील कॅमेरा सेन्सर आणि सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरच्या बाजूला 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे.

बॅटरी: या टॅबला बॅटरी लाईफ देण्यासाठी पॉवरफूल 8000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!