रुपाभवानीमातेचे दर्शन घेणे उपमहापौर राजेश काळेला महागात, खबऱ्यामार्फत माहिती, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

| Updated on: Jan 05, 2021 | 3:06 PM

तुळजापूर रोडवरील रुपा भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी उपमहापौर राजेश काळे आल्याचे पोलिसांना खबऱ्या मार्फत कळताच शहर गुन्हे शाखेने त्याला लातूरकडे जाताना पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे.

रुपाभवानीमातेचे दर्शन घेणे उपमहापौर राजेश काळेला महागात, खबऱ्यामार्फत माहिती, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात!
Follow us on

सोलापूर : महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याप्रकरणी फरार असलेल्या उपमहापौर राजेश काळे यांना सोलापूर शहराच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. 29 डिसेंबरला उपमहापौर राजेश काळे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र आज सकाळी तुळजापूर रोडवरील रुपा भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी उपमहापौर राजेश काळे आल्याचे पोलिसांना खबऱ्या मार्फत कळताच शहर गुन्हे शाखेने त्याला लातूरकडे जाताना पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे.  (Solapur Police Arrested deputy mayor Rajesh kale)

जुळे सोलापूर भागातील एका सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नियमबाह्य पद्धतीने इ- टॉयलेटसह इतर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी उपमहापौर राजेश काळे याने पालिका उपायुक्त धनराज पांडे यांच्याकडे तगादा लावला होता. मात्र यासंदर्भात लेखी पत्रव्यवहार करण्याची सूचना केल्यानंतर संतापलेल्या राजेश काळे याने उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्य शिवीगाळ केल्याच्या प्रकार समोर आला होता.

याप्रकरणी स्वतः उपायुक्त धनराज पांडे आणि सदर बाजार पोलिस ठाण्यात उपमहापौर राजेश काळे याच्या विरोधात शिवीगाळ आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून म्हणजे 29 डिसेंबर पासून राजेश काळे हा फरार होता. तेव्हापासून सोलापूर शहर गुन्हे शाखेचे पोलीस राजेश काळे यांच्या मागावर होते.

फरार काळात उपमहापौर राजेश काळे यांनी परभणी सातारा आणि पुण्यात वास्तव केल्याचं पोलिस तपासात समोर आल आहे. आज सकाळी सोलापूर शहरातील रुपा भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी राजेश काळे आल्यावर खबऱ्यांनी ही माहिती पोलिसांना ही माहिती दिली.

पोलीसांनी त्यावर पाळत ठेवून लातूरकडे जात असताना त्याला ताब्यात घेतले आहे.शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे, सचिन बंडगर यांच्या पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आहे. शहर गुन्हे शाखेने आरोपी राजेश काळे याला ताब्यात घेऊन सदर बाजार पोलिसांचा तब्येत पुढील तपासासाठी दिले आहे. (Solapur Police Arrested deputy mayor Rajesh kale)

हे ही वाचा :

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक, पुणे ते टेंभुर्णीपर्यंत पाठलाग!