Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार? ती मागणी पुढे येताच भाजप गोटातूनही मोठी प्रतिक्रिया
Sunetra Pawar become CM?: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाना यश आले नाही. सध्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. अजितदादा हे बारामतीचे आतापर्यंत नेतृत्व करत होते. आता सुनेत्रा पवार नेतृत्व करतील. त्याचवेळी मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीकडून भावनिक साद घालण्यात आली आहे. त्याला भाजपकडूनही उत्तर देण्यात आले आहे.

Chandrakant Patil on Sunetra Pawar: सध्या पवार कुटुंब हे बारामती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत व्यग्र आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न फसला. अजितदादांच्या रिक्त जागी ही पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा पवार यांना बारामतीचा किल्ला सर करणे अवघड मानले जात नाही. निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीतून जोर धरत आहे. त्यावर भाजपमधूनही पहिली प्रतिक्रिया धडकली आहे. काय आहे राजकारणातील मोठी अपडेट?
आदिती तटकरेंची भावनिक साद
बारामतीत प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला. त्यावेळी झाडून राष्ट्रवादीचे नेते हजर होते. विशेष म्हणजे पवार कुटुंबिय सुद्धा या प्रचाराचा भाग झाले आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे नेतेही प्रचारात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. तीन दिवसांपूर्वी बारामतीत झालेल्या कार्यक्रमात मंत्री आदिती तटकरे यांनी सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण करतील अशी भावनिक साद त्यांनी घातली. त्यांच्या या मागणीने राजकारणात नवीन विषय चर्चिला गेला. राज्यात कणखर महिला राजकारण्यांचा इतिहास आहे. पण अद्याप मुख्यमंत्री पदाची गवसणी कुणालाही घालता आलेली नाही. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीतून त्यांच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहिली जात आहेत.
चंद्रकांत पाटील यांची मोठी प्रतिक्रिया
आदिती तटकरे यांनी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हावे असे स्वप्न असल्याची भावना बारामती प्रचाराच्या शुभारंभावेळी व्यक्त केली. त्यावर मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी खास प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या बोलक्या प्रतिक्रियेची चर्चा रंगली आहे. जे स्वप्न पाहत नाहीत, ते कधीच वाढत नाहीत. आपल्या नेत्याला मोठं बघण्याचं स्वप्न हे प्रत्येक कार्यकर्त्याला बघायचंच असतं. त्यामुळे उद्या काय आहे हे कुणी बघितलं? आज तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. महायुतीत आमचे 132 अधिक 5 अपक्षांचे असे सरकार आहे. आदिती ताईने जे म्हटलं आहे ते काहीच चुकीचं नाही. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या नेत्याला मुख्यमंत्रीच काय तर अजून मोठं होण्याची स्वप्न पाहायची असतात. स्वप्न पाहणाऱ्या माणसाचा स्पीड वाढतो. स्वप्न पाहणारी माणसं आपला पक्ष वाढवतात, असे मोठे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.