Pune Crime| दारू पिण्याच्या वाद इतका टोकाला गेला कि तीक्ष्ण हत्याराने भोकसून केली हत्या

| Updated on: Jan 26, 2022 | 1:09 PM

आरोपी व मयत यांच्यात वादावादी झाली. ढाब्यावर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी मयत अशोक लक्ष्मण भापकर याला बोलावून तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, तोंडावर वार करून त्यांचा खून केला.

Pune Crime| दारू पिण्याच्या वाद इतका टोकाला गेला कि तीक्ष्ण हत्याराने भोकसून केली हत्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पुणे- पुरंदर तालुक्यातील भापकरमळा येथे दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकाचा धारदार शास्त्राने खून (Murdered)  करण्यात आला आहे. याबाबत सासवड पोलिसात (saswad Police) मयताच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. मयत अशोक भापकर याच्या पत्नीने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. घटनेनंतर घटनास्थळाला सासवड भोर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेट दिली आहे.

नेमकं घडलं काय

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, अशोक लक्ष्मण भापकर यांना दारूचे व्यसन होते. घटनेच्या दरम्यान आरोपी संजय बबन भापकर व किरण झेंडे (दोघे रा.दिवे ता.पुरंदर) हे तिघे काळेवाडीच्या ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. तिथे तिघेही दार पिले. त्यावेळी त्यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर आरोपी व मयत घरी आले. त्यानंतर ढाब्यावर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी मयत अशोक लक्ष्मण भापकर याला बोलावून तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, तोंडावर वार करून त्यांचा खून केला.   पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत. पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम 302 व 34  नुसार गुन्हा दाखल केला आहे.

लाखोंचे मोबाईल पळवणारे चोरटे अटकेत
दुसरीकडे पिंपरी चिंचवड मधील भोसरी भागतील मोबाईल शोरूम फोडून लाखोंचे मोबाईल पळवणा-या बंगाली टोळीला अटक करण्यात आली आहे. भोसरी येथील एम आर सूर्य इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि समर्थ मोबाईलचे शोरूम फोडून चोरट्यांनी 61 लाख रुपये किमतीचे 244 मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना घटना 4 जानेवारी रोजी उघडकीस आली होती. ही घरफोडी पश्चिम बंगाल येथील आरोपींनी केली असून त्यात पश्चिम बंगाल येथील तीन जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. जानीबुलहक मामुलत अली, जब्बार कुतुब अली, जहांगीरअलम मामुदी शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. तर आलम मोंटू शेख, नूरइस्लाम उर्फ जंजाली मामुलत अली, अल्लाउद्दीन मामुलत अली हे तिघेजण सध्या फरार आहेत.

flag hoisting | नागपुरात भिक मागणाऱ्याने फडकविला तिरंगा; झोपडीबाहेरच ध्वजारोहण, कारण काय?

झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा, महाराष्ट्राच्या चित्ररथाचं राजपथावर दमदार सादरीकरण

budget 2022 | 28 फेब्रुवारीला सादर केला जाणारा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होऊ लागला! यामागचं लॉजिक काय?