Pune Corona Update | पुणेकरांची चिंता वाढली, एका दिवसात 399 कोरोनाबाधितांची नोंद तर 216 जणांना डिस्चार्ज

| Updated on: Aug 25, 2021 | 7:19 PM

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत असलेली कोरोनाबाधितांची (Corona Patient) संख्या पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळे पुणेकरांच्या (Pune) चिंतेत वाढ झाली आहे. कालपासून पुण्यात 399 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

Pune Corona Update | पुणेकरांची चिंता वाढली, एका दिवसात 399 कोरोनाबाधितांची नोंद तर 216 जणांना डिस्चार्ज
CORONA
Follow us on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत असलेली कोरोनाबाधितांची (Corona Patient) संख्या पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळे पुणेकरांच्या (Pune) चिंतेत वाढ झाली आहे. कालपासून पुण्यात 399 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनानं पुण्यात पुन्हा डोकं वर काढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासांत पुणे शहरात 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 216 कोरोनाबाधितांना उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे. (The number of corona victims in Pune city has increased once again)

आतापर्यंत पुणे शहरात 8898 कोरोनाबाधितांचा मृत्यू

पुणे शहरात गेल्या 24 तासांत 8961 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यासोबतच आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या 3082793 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत पुणे शहरात 8898 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

208 रुग्णांची स्थिती गंभीर

सध्या पुण्यात 2066 कोरोनाबाधितांवर शहरातल्या विविध खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उचपार सुरू आहेत. त्यापैकी 208 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. पुण्यात आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 494185 झाली आहे तर 483221 कोरोनाबाधितांना यशस्वी उपचार झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या 100 च्या आत

सोमवारी पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या 100 च्या आत आली होती. सोमवारी पुण्यात 97 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. पण दोनच दिवसांत एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

पुणे मनपाकडून आता घरोघरी जाऊन लसीकरण

पुणे महानगपालिकेकडून (Pune Municipal Corporation) अंथरुणाला खिळलेल्यांना घरोघरी जाऊन लसीकरण (door-to-door vaccination) मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंगळवारपासून ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. एका दिवसात कोथरुडमधल्या (Kothrud) 9 जणांना घरी जाऊन कोरोनाची लस देण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार, अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांना कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस घरी जाऊन देण्यात येणार आहेत. त्यासाठी नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रांची काळजीपूर्वक पूर्तता करून जमा करण्याचं आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

घरी लसीकरणासाठी कसा करणार अर्ज?

अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणासाठी bedriddenvaccination.pune@gmail.com या ईमेलवर ऑनलाईन अर्ज करणाचं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.

घरी लसीकरणासाठी कोणती कागदपत्र लागणार?

संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळल्याचे कारण, सदरची व्यक्ती लसीकरणास पात्र असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रमाणपत्र आणि त्याच्या नातेवाईकांचे संमतीपत्र ही कागदपत्रं लसीकरणासाठी आवश्यक आहेत.

इतर बातम्या :

महाराष्ट्राच्या शेती विकासात महत्वपूर्ण योगदान, पद्मश्री बनबिहारी निंबकर यांचे निधन

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात टोमॅटोचा लाल चिखल, किलोला एक ते दीड रुपया दर, शेतकऱ्यांची परवड सुरुच