Pune Osho Ashram : ओशो आश्रमचे भूखंड विक्रीला, भक्तांचा संताप, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Mar 06, 2021 | 4:34 PM

पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमातील दोन भूखंड विक्रीला काढले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. | Osho Ashram pune

Pune Osho Ashram : ओशो आश्रमचे भूखंड विक्रीला, भक्तांचा संताप, नेमकं प्रकरण काय?
ओशो
Follow us on

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमातील दोन भूखंड विक्रीला काढले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कोरोनामुळे आश्रम आर्थिक अडचणीत आल्यामुळे भूखंड विकायचा निर्णय घेतल्याचा दावा ओशो आश्रमाच्यावतीने करण्यात आलाय. दरम्यान ओशो यांच्या भक्तगणांनी मात्र या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त केलाय. (The sale of Osho Ashram land due to Corona crisis)

पुण्यातल्या कोरेगाव पार्कात ओशो आश्रम

पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे रजनीश उर्फ ओशो यांचा 18 एकर परिसरात आश्रम आहे. झुरिच मधील ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन यांची मालकी असलेला हा आश्रम जगभरातल्या लोकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. देश-विदेशातून अनेक लोक या ठिकाणी येत असतात.

दोन भूखंड विक्रीला

याच केंद्रांमधील दोन मोठे भूखंड विक्रीसाठी काढण्यात आले आहेत. यासाठी परवानगी मिळावी म्हणून ऊन इंटरनॅशनलच्यावतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयात अर्ज करण्यात आला आहे. या भूखंडासाठी तीन मोठ्या उद्योगपतींकडून बोली लावण्यात आली होती.

या जागेशेजारी ज्यांचा बंगला आहे त्या राजीव बजाज यांनी सर्वाधिक तब्बल एकशे सात कोटींना हे भूखंड विकत घेण्याची तयारी बजाज यांनी दाखवलीय. दरम्यान भूखंड विक्री म्हणजे ओशो आश्रम बंद करण्याचं एक मोठं षडयंत्र असल्याचं सांगत ओशो यांच्या भक्तांनी या भूंखड विक्रिला विरोध दर्शवलाय.

भक्तांचा संताप, भूखंड विक्रीला ब्रेक?

धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी मिळाल्यानंतर ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, मात्र भक्तांनी आक्रमकपणे विरोध केल्यामुळे भूखंड विक्रीला ब्रेक लागण्याची शक्यता जास्तच आहे.

(The sale of Osho Ashram land due to Corona crisis)

हे ही वाचा :

‘डॅडी’ अरुण गवळी आजोबा होणार, अभिनेता अक्षय वाघमारेकडून गुड न्यूज

भाजपच्या महिला आमदाराचं हे ट्विट सरकारच्या जिव्हारी लागणार?