अखेर नाट्यगृहांची घंटा वाजणार, 50 टक्के क्षमतेनं सुरु होणार, अजित पवारांची घोषणा

| Updated on: Oct 08, 2021 | 5:08 PM

सोमवारपासून खाजगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहोत, असं अजित पवार म्हणाले. मात्र नियमाचे पालन करूनचं ही परवानगी असेल. सोमवारपासून कॉलेज सुरू करण्याची परवानगी देत आहोत.

अखेर नाट्यगृहांची घंटा वाजणार, 50 टक्के क्षमतेनं सुरु होणार, अजित पवारांची घोषणा
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us on

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर अजित पवारांनी कोरोनाची नवी गाईडलाईन जारी केली. त्यानुसार नाट्यगृह, सिनेमागृहही सुरु करण्याचे संकेत अजित दादांनी दिले आहे. 22 ऑक्टोबर 2021 पासून 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह, सिनेमागृह सुरु करण्याचा विचार करीत आहोत. दसऱ्याच्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आमच्या सोयीने बैठक घेऊन ठरवू, असे अजितदादा म्हणाले. (Theaters and cinemas will be started in Pune from October 22, announced Ajit Pawar)

कॉलेज सुरु करण्यास परवानगी

सोमवारपासून खाजगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहोत, असं अजित पवार म्हणाले. मात्र नियमाचे पालन करूनचं ही परवानगी असेल. सोमवारपासून कॉलेज सुरू करण्याची परवानगी देत आहोत. शिक्षकांचे कोरोना लसीचे दोन डोस झालेले असणं बंधनकारक आहेच त्याशिवाय विद्यार्थ्यांचे देखील दोन डोस झालेले असणं आवश्यक आहे. पुण्याबाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.

सोमवारपासून राज्य आणि केंद्र सरकारशी संबधित ट्रेंनिग सेंटर सुरू करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. कोरोना लसीकरणात राज्यात पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, असं अजित पवार म्हणाले.

झोपडपट्टी परिसरात लसीकरण वाढवण्याच्या सूचना पवारांनी दिल्या. झोपडपट्टी परिसरात लसीकरण कमी होत आहे. पुण्याचा कोरोना दर 2.5 दर आहे. बाधित दर 3 टक्के आला आहे. पहिला डोस घेण्याऱ्यांचे प्रमाण 103 टक्के आहे. पिंपरी चिंचवड मध्ये लसीकरणाचा वाढवण्याची गरज आहे. जिल्ह्याने एक कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे.

अजित पवार काय म्हणाले?

दर आठवड्याच्या प्रथेप्रमाणे आज बैठक पार पडली. सोमवारपासून खासगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहोत. सोमवारपासून महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी देण्यात आलीय. तर 22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह सुरु करणार आहोत. तसंच सोमवारपासून राज्य आणि केंद्र सरकारशी संबंधित ट्रेनिंग सेंटर सुरु करणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

राज्यात पुणे जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. झोपडपट्टी परिसरात लसीकरण वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. झोपडपट्टी परिसरात लसीकरण कमी होत आहे. पुण्यात कोरोना दर 2.5 टक्के आहेत. तर कोरोना बाधितांचा दर 3 टक्के आहे. तर पुण्यात पहिल्या डोस घेणाऱ्यांचं प्रमाण 103 टक्के आहे. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरण वाढवण्याची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले. (Theaters and cinemas will be started in Pune from October 22, announced Ajit Pawar)

इतर बातम्या

बोलणार नाही म्हणता म्हणता अजित पवार भरपूर बोलले, पाहुणे जाऊ द्या विथ प्रुफ बोलतो!

मोठी बातमी ! पुण्यात बाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी RTPCR बंधनकारक, दोन्ही डोस घेतलेल्यांना कॉलेजमध्ये प्रवेश