Pune crime : दगडानं मारहाण करत पुण्यातल्या दौंडमध्ये रेल्वे प्रवाशाला लुटलं; तासाभरातच पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

| Updated on: May 30, 2022 | 11:34 AM

फिर्यादींनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असता, दौंड-पाटस रोडवरील एस. आर. पेट्रोल पंपाजवळ एका आरोपीला पकडण्यात आले. तर दुसऱ्या आरोपीच्या घराचा पत्ता मिळाल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली आहे.

Pune crime : दगडानं मारहाण करत पुण्यातल्या दौंडमध्ये रेल्वे प्रवाशाला लुटलं; तासाभरातच पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
प्रवाशाला लुटल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना केली अटक
Image Credit source: tv9
Follow us on

दौंड, पुणे : दौंड कॉर्डलाइन रेल्वे स्थानकावर (Daund railway station) प्रवाशाला दगडाने मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोनजणांना दौंड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. टेंभुर्णी या ठिकाणी कामाला जाण्यासाठी दौंड कॉर्डलाइन रेल्वे स्थानकावर थांबलेल्या प्रवाशाला दगडाने मारहाण करून लुटणाऱ्या (Robbed) दोघा जणांना दौंड लोहमार्ग पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे. करण चव्हाण (वय 22, रा. तीन नं. शाळेजवळ, रेल्वे ग्राऊंड, दौंड) आणि रोहित गायकवाड (वय 30, रा. संभाजीनगर, गोवा गल्ली, दौंड) अशी आरोपींची नावे असून जबरी चोरी केल्या प्रकरणी फिरोज यादव यांनी दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत केली असून आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली आहे. तर पीडित प्रवाशाला दौंड लोहमार्ग पोलिसांनी वैद्यकीय मदत केली.

फिर्यादीस अडवत मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या साथीदारासह 29 मे रोजी रात्री 12.30च्या सुमारास दानापूर एक्स्प्रेस या गाडीने मनमाडहून दौंडला कामानिमित्त आले. येथील कॉर्डलाइन स्टेशनवर दोघे उतरले असता रेल्वे स्टेशनजवळच आरोपींनी फिर्यादी यांना अडवले आणि बॅग मे क्या है, असे विचारत एका आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात तर दुसऱ्या आरोपीने छातीवर दगडाने प्रहार केले. मारहाण करीत खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 25 हजार 709 रुपयांचा ऐवज लुटला आणि पसार झाले.

हे सुद्धा वाचा

रांजणात बसला होता लपून

फिर्यादींनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असता, दौंड-पाटस रोडवरील एस. आर. पेट्रोल पंपाजवळ एका आरोपीला पकडण्यात आले. तर दुसऱ्या आरोपीच्या घराचा पत्ता मिळाल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली आहे. आधी तर पोलिसांना पाहून घरच्यांनी आरोपीच्या बचावासाठी तो घरीच आला नाही, असे सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्याने घराची झडती घेतली असता तो रांजणात लपून बसल्याचे आढळून आले. आरोपींविरोधात पोलिसांनी 394, 34 (जबरी चोरी आणि मारहाण) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.