मी सुद्धा भरपूर खाज असलेला खासदार आहे; उदयनराजेंची फटकेबाजी

| Updated on: Jan 19, 2021 | 3:42 PM

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आज ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन झाले. (Udayanraje Bhosale Inaugurated Grade Separator in satara)

मी सुद्धा भरपूर खाज असलेला खासदार आहे; उदयनराजेंची फटकेबाजी
उदयनराजे भोसले, भाजप खासदार
Follow us on

सातारा: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आज ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन झाले. यावेळी उदयनराजे यांनी जोरदार फटके बाजी केली. ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासाठी मंत्रीच कशाला हवेत. मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे, अशी जोरदार फटकेबाजी उदयनराजे यांनी केली. (Udayanraje Bhosale Inaugurated Grade Separator in satara)

साताऱ्यातील पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात आले आहे. त्याचे आज उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावरून टीका होत असतानाच उदयनराजे यांनी त्यावरून जोरदार फटकेबाजी केली. मंत्र्यांच्याच हस्ते उद्घाटन करायचं असा काही कायदा आहे का? ते मंत्री असले तरी आधी आमदार आणि खासदार आहेत ना. मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही. भरपूर खाज असलेला खासदार आहे, असं त्यांनी सांगितलं.

पोरं व्हायलाही नऊ महिने लागतात

ग्रेड सेपरेटरच्या कामलाा उशिर झाल्याबद्दलही त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी त्यांच्या खास अंदाजात फटकेबाजी केली. काम करताना… एक लक्षात घ्या… थोडा त्रास होणार. पोरंही एका दिवसात होत नाहीत. नऊ महिने लागतात… त्रास तर होतोच… त्रास झाल्याशिवाय मुलंही होत नाहीत… हे तर ग्रेड सेपरेटर आहे, थोडा त्रास तर होणारच, असा चिमटाही त्यांनी काढला.

अभी के अभीच

यापूर्वी 8 जानेवारी रोजी उदयनराजे ग्रेड सेपरेटरच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी फित कापून रस्ता खुला केल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांच्या खास स्टाईलमध्ये कॉलर उडवत त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. आजपासून… होय, आजपासून हा रस्ता जनतेसाठी खुला झाला आहे. ते काय म्हणतात…. अभी के अभीच!, असं म्हणंत त्यांनी कॉलर उडवली होती. तेव्हा एकच हशा पिकला होता. (Udayanraje Bhosale Inaugurated Grade Separator in satara)

संबंधित:

रस्ता कधी सुरु होणार, राजेंनी हिंदी डायलॉग फेकला, म्हणाले ‘अभी के अभी’

Special Report | पुण्यात लग्न समारंभात उदयनराजे आणि रामराजेंची गळाभेट 

(Udayanraje Bhosale Inaugurated Grade Separator in satara)