Kirti Shiledar| ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक कलाकार कीर्ती शिलेदार यांचे निधन ; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते जयराम शिलेदार व अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या होत्या. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवले होते. त्यांनी संगीत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी, संशय कल्लोळ, स्वयंवर, संगीत सौभद्र, मृच्छ कटिक, मंदोदरी, एकच प्याला या सारख्या नाटकांना कीर्ती शिलेदार यांचा सूर मिळाला होता.

Kirti Shiledar| ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक कलाकार कीर्ती शिलेदार यांचे निधन ; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
kirti shiledar
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 10:26 AM

पुणे – ज्येष्ठ गायिका(singer) आणि संगीत नाटक कलाकार( musical artist) कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांचे आज निधन झाले आहे. त्या 70 वर्षांच्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांना शनिवारी उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर डायलेसीसचे उपचार सुरु होते.

वयाची साठ वर्षे रंगभूमीसाठी
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते जयराम शिलेदार व अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या होत्या. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवले होते. त्यांनी संगीत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी, संशय कल्लोळ, स्वयंवर, संगीत सौभद्र, मृच्छ कटिक, मंदोदरी, एकच प्याला या सारख्या नाटकांना कीर्ती शिलेदार यांचा सूर मिळाला होता.अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

नाटकांचे 4000 हून अधिक प्रयोग

कीर्ती शिलेदार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी साहित्य शाखेच्या पदवी घेतली होती. त्यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर 4000 हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली.

Pune School Reopen : पुण्यातल्या शाळा सुरु होणार का? निर्णयासाठी आजचा दिवस मोठा, अजित पवारांची बैठक

Priyanka Chopra | प्रियंका आई होताच सेलिब्रिटींच्या दिलसे शुभेच्छा, कोण काय म्हणालं?, फॅन्सचा सल्ला काय?

Market Committee Election| 14 बाजार समित्यांचे संचालक बिनघोर; नाशिकमध्ये कधीपर्यंत निवडणुका लांबल्या?