मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)आई झाली आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Nick Jonas) यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. सरोगसीच्या (Surrogacy) माध्यमातून ही अभिनेत्री आई झाली. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून ही बातमी तिच्या चाहत्यांशी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रियांकाने लिहिले की, ‘आम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, आम्ही आमच्या मुलाचे सरोगसीद्वारे स्वागत केले आहे. प्रियांकाच्या या पोस्टवर सेलिब्रिटींनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
खूप आनंदी आहोत प्रियंकाची सोशल मिडीया पोस्ट
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये प्रियंका चोप्राने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर लगेच सरोगसीद्वारे आपण आई झाल्याचे प्रियंकाने जाहीर केले आहे. “आम्ही नुकतेच बाळाचे स्वागत केल असून आम्ही खूप आनंदी आहोत. सध्या आम्ही आमच्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे अशा विशेष क्षणी गोपनीयता बाळगण्याचे आवाहन सुद्धा प्रियंकाने यावेळी केले.
View this post on Instagram
या सेलिब्रिटींनी केला शुभेच्छांचा वर्षाव (Celebrities gave good wishes)
प्रियांकाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांपासून अनेक सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सानिया मिर्झाने हार्टचे ईमोजी शेअर करत मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री भूमी पेडणेकरने पाच हार्टचे ईमोजी शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
तर नुकतेच लग्न झालेल्या कतरिना कैफने Congratssssssss लिहत आपला आनंद व्यक्त केला आहे.
अभिनेत्री आथिया शेट्टी, ईशा गुप्ता, पूजा हेगडे यांनी सुद्धा हार्टचे ईमोजी शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. या मध्ये ईशा गुप्तानी हार्टचे ईमोजी सोबतच नजर लागू नये म्हणून त्याचे सुद्धा ईमोजी शेअर केलेला दिसून येत आहे. तर पूजा हेगडेने तुमचे जीवन प्रकाशाने भरुन जावे म्हणत खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या हॉट लूकमुळे सतत चर्चेत असणाऱ्या मलायका अरोराने सुद्धा congratulation म्हणत शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री हुमा कुरेशी हीने देखील Amazing!म्हणत आपले प्रेम व्यक्त केले आहे.
फॅन्सनी दिला हा सल्ला
एकीकडे शुभेच्छाचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे मात्र मुल दत्तक का घेतलं नाही, असा सवाल वाचकांनी केली आहे. तर मुल दत्तक हा पर्याय होता, असं एका फॅनचं मत आहे. तर काहींनी सरोगसी करणं हा उत्तम पर्याय नव्हता. या शिवाय अजून बरेच पर्याय उपलब्ध होते असा सल्ला देखील प्रियांका चोप्राला दिला आहे.
2018 साली लग्नगाठ बांधली
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांनीही लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. अलीकडेच प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती निक जोनासचे आडनाव काढून टाकले होते, त्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. मात्र, नंतर ती केवळ अफवा असल्याचे समोर आले.
इतर बातम्या :
Priyanka Chopra | पाळणा हलला, प्रियंका चोप्रा झाली आई; मुलगा की मुलगी ? चाहत्यांना दिली खास माहिती
Pushpa in Hindi : ‘पुष्पा’ आता हिंदीमध्ये, लवकरच टीव्हीवरही दाखवला जाणार