Vidyanand Bapat Dance: दहीहंडीत सुपरस्टार ‘बापट’ नाचले; पुणेकरांच्या कल्पनाशक्तीला सलाम
Vidyanand Bapat Dance: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विद्यानंद बापट यांचा भन्नाट डान्स पाहण्यासारखा आहे. हा डान्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा विषय आज राज्यात चर्चेत आला आहे. यावर सडेतोड आणि तार्किक भूमिका मांडणारे विद्यानंद बापट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या या भूमिकेने राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणेकरांच्या कल्पकतेचा नमुना असलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर हसू अनावर झाले आहे.
काय व्हिडीओ आहे?
आज संपूर्ण देशात दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पुण्यातही या उत्सवाची खास परंपरा आहे. अनेक मंडळे डीजे लावून दहीहंडीचा आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहेत. अशा वेळी डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच डीजेवर नाचवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एक मंडाळाने दहीहंडी उत्सव साजरा करताना डीजेच्या एलईडी स्क्रीनवर विद्यानंद बापट यांचा एआय-जनरेटेड व्हिडीओ चालवला आला. या व्हिडीओमध्ये बापट स्वत: नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओपाहून अनेकांनी “नाद करा पण पुणेकरांचा कुठे!” अशा कमेंट्स केल्या आहेत.
झाली सुरुवात… pic.twitter.com/4UkJjIaz4c
— पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) September 4, 2026
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
विद्यानंद बापट यांचे एआय पोस्टर सध्या चांगलेच चर्चेत आहे. दहीहंडी उत्सवातील हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने ‘बापटांचा वैचारिक विजय. झोंबिनसोबत तार्किक युक्तिवाद अशक्य आहे’ अशी कमेंट केली. त्यानंतर दुसऱ्या एका यूजरने, एका बापटाने या लोकांना त्याच्यावर गाणे करून ते वाजवायला भाग पाडले. इथच ते हरले.. कारण आता हीच लोक त्याला अवास्तव महत्व देत आहेत. समस्त अण्णा, अप्पा, भाऊ, नाना, दिल्या, पक्या, सुऱ्या, सुन्या कॅटेगरी लोकांना बापटाच्या तालावर नाचायला लागत आहे अशी कमेंट केली आहे. तर तिसऱ्या एका यूजरने झोंबी. हे मेले तरी भूत बनून डिजे पुढे नाचायला येतील असे म्हटले आहे. आणखी एका यूजरने ‘दहीहंडीत सुपरस्टार ‘बापट’ नाचले’ अशी मजेशीर कमेंट केली आहे.
थेट अवधूत गुप्तेने बनवले गाणे
विद्यानंद बापट यांनी डीजे विरोधात घेतलेल्या भूमिकेला अनेकांनी पाठिंबा दिला तर काहींनी थेट सुनावले. प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यांनी अनोख्या पद्धतीने विद्यानंद बापट यांना पाठिंबा दिला. अवधुत गुप्ते यांनी विद्यानंद बापट यांच्यावर थेट गाणे काढले आहे. ‘तुझ्या सारख्या सरळ माणसाचा ना हा धंदा, विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे देखील सध्या चांगलेच चर्चेत आहे.