‘राऊतांनी केलेल्या घोटाळ्याचा मला फटका, बारामतीकरांनी बाजारू राजकारण आणलं, विजय शिवतारेंचा घणाघात, तर शिंदेंची स्तुती

| Updated on: Aug 02, 2022 | 5:59 PM

संजय राऊत आणि नार्वेकर यांनी हवेलीत पैसे घेतले आणि पालिका निवडणुकीत चुकीच्या माणसाला तिकीट दिले. बाजारू राजकरण कुणी आणले असेल तर यांनी आणले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने सात्विक राजकरण आले आहे, अशी टीका विजय शिवतारेंनी केली.

राऊतांनी केलेल्या घोटाळ्याचा मला फटका, बारामतीकरांनी बाजारू राजकारण आणलं, विजय शिवतारेंचा घणाघात, तर शिंदेंची स्तुती
पुण्यातील कार्यक्रमादरम्यान विजय शिवतारे
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या घोटाळ्याचा फटका मला बसला, असा घणाघात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना झालेल्या कार्यक्रमात शिवतारे (Vijay Shivtare) बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यासह पवार कुटुंबीयांवरही टीका केली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचे भरभरून कौतुक आणि स्तुतीही केली. ते म्हणाले, की मी आलो तेव्हा या मतदारसंघात एकही ग्रामपंचायत सदस्य नव्हता, सरपंच नव्हता. आता 70 ते 80 टक्के सदस्य सेनेचे आहेत. 50 वर्ष शरद पवारांनी या पुरंदरला काही दिले नाही. पाणी दिले म्हणालेत मग काय उपकार केलेत, असा सवाल त्यांनी केला आहे. तर शरद पवारांनी (Sharad Pawar) तुम्ही काही दिले नाही. मात्र आम्ही दिले ते तरी कुणाच्या तोंडून घास काढून घेऊ नका, तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही, अशी टीका केली.

‘लक्ष दिले गेले नाही’

आमच्या आमदारांना सर्व ठिकाणी अपशद्ब बोलले जातात. एकनाथ शिंदेंनी आमदारांना नाहीतर तर आमदारांनी एकनाथ शिंदेंना नेले होते, असा दावा शिवतारेंनी यावेळी केला. सर्वच जण बोलत होते, मात्र लक्ष दिले गेले नाही. मी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगितले उद्धव साहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडा, मात्र काहीही झाले नाही. आज कुणाला रेडा म्हणतात, कुणाला काय म्हणतात, अशी टीका त्यांनी केली.

‘अपघाताने निवडून आला’

अपघाताने हे आमदार निवडून आले आहेत, अशी टीरा संजय जगताप यांच्यावर त्यांनी यावेळी केली. पहिल्या कॅबिनेटमध्ये 4 टीएमसी पाणी अजित पवारांनी बारामतीला नेले. हा गाढव आमदार एक शब्दही बोलला नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. अजित पवार यांनी राष्ट्रीय बाजार यशवंत कारखन्याकडे वळवला. पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी हा बाजार महत्त्वाचा होता, त्यावेळी का आम्हाला बोलवले नाही, असा सवाल त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

‘बारामती स्टँडसाठी पैसा मग पाणीपुरवठा योजनेसाठी का नाही?’

उद्धव साहेब तुम्हाला एसटी स्टँडसाठी बारामतीला देण्यासाठी 200 कोटी होते, मग पाणी पुरवठा योजनेसाठी का पैसे दिले नाहीत, असा सवाल करत उद्धव साहेब तुम्ही मतदारांचा अपमान केला, असे ते म्हणाले. भाईंच्या रूपाने देव मिळाला. नाहीतर पुढचे अडीच वर्ष काय झाले असते माहीत नाही. महाविकास आघाडीचे सरकार नतद्रष्ट होते. त्यांनी 3 वर्षात जो अन्याय केला, भाईंनी तो 30 दिवसांत मिटवला, असे शिवतारे म्हणाले.

पुण्यात काय म्हणाले विजय शिवतारे?

‘पैसे घेऊन तिकीट दिले’

संजय राऊत आणि नार्वेकर यांनी हवेलीत पैसे घेतले आणि पालिका निवडणुकीत चुकीच्या माणसाला तिकीट दिले. बाजारू राजकरण कुणी आणले असेल तर यांनी आणले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने सात्विक राजकरण आले आहे. आताचा आमदार अपघाताने आला आहे, बारामतीचा बटीक झाला आहे, अशी टीका त्यांनी केली. तर 2024पर्यंत गुंजवणीचे पाणी पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या शेतात असेल. गुंजवणीचे पाणी आणि विमानतळ आणल्याशिवाय या विजय शिवतारेला देव मरणाची परवानगी देणार नाही, असेही ते म्हणाले.