उठावाचं बीज एकनाथ शिंदे यांच्या मनात कोणी भरलं, विजय शिवतारे यांनी सांगितलं

ही महाविकास आघाडी नंतर नाही झाली. ७० सीट तुमच्या आमच्या लढवून घालवल्या. त्या उद्धव ठाकरे यांनी घालवल्या.

उठावाचं बीज एकनाथ शिंदे यांच्या मनात कोणी भरलं, विजय शिवतारे यांनी सांगितलं
विजय शिवतारे
| Edited By: | Updated on: Dec 25, 2022 | 5:31 PM

पुणे : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे पुण्यात बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार हे महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं. पहिल्या दोन महिन्यातचं उचलं खाल्ली होती. उठावं करण्याचं बीज एकनाथ शिंदे यांच्या मनात विजय शिवतारे यांनीचं पेरलं होतं. साडेचार तास नंदनवनला बसलो होतो. महाविकास आघाडी सरकारला दोन महिने झाले होते. महाविकास आघाडीच्या हिताचं हे सरकार नाही. हे चालणार नाही. उद्धव ठाकरे चुकताहेत. तुम्ही त्यांना सांगा हे तोडलं पाहिजे. भाजप सेनेचं सरकार आलं पाहिजे, असं शिंदे यांना सांगत होतो.

ही महाविकास आघाडी नंतर नाही झाली. ७० सीट तुमच्या आमच्या लढवून घालवल्या. त्या उद्धव ठाकरे यांनी घालवल्या. तुम्ही आमचा आमदार पाडतो. ठीक आहे. आम्ही तुमचा मंत्री पाडतो, असं राजकारण निवडणुकीच्या काळात सुरू होतं. हे सगळं कशामुळं झालं. तर निवडणुकीपूर्वी सेटलमेंट झाली. कुठल्या सीट पाडायच्या. कुठल्या सीट निवडून आणायच्या.

हे सगळं कट कारस्थान महाविकास आघाडी नंतर झाली नाही. हे फसवताहेत लोकांना. हे अगोदरचं झालं होतं, असा आरोपही विजय शिवतारे यांनी केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. पुरंदरला विकास केला नाही. बाजार पळवून नेला. किती लाचारी करालं. एवढी लाचारी करून लोकांची फसवणूक करत असाल, तर चालणार नाही. पापाचं परिमार्जन करण्यासाठी हातात धनुष्यबाण उचलला आहे, असं विजय शिवतारे यांनी सांगितलं.

जागा भाजपकडं असली, तर शिंदे-फडणवीस यांचा धागा पक्का आहे. ही घट्टता लोकल लेवलला आली पाहिजे. आपले राजकीय शत्रू कोण हे ओळखता आले पाहिजे, असंही शिवतारे म्हणाले.