रुग्णालय दोषी, 5 तास 30 मिनिटे रुग्णावर उपचार नाही…, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची माहिती

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, राज्य शासनाच्या समितीचा अहवाल आला आहे. या प्रकरणात आणखी दोन समित्या आहेत. मृत्यू झालेली व्यक्ती ही माता असल्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल येणार आहे. तसेच धर्मादाय आयुक्तांचा अहवाल येणार आहेत. शासनाच्या अहवालात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे.

रुग्णालय दोषी, 5 तास 30 मिनिटे रुग्णावर उपचार नाही..., महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची माहिती
Deenanath Mangeshkar Hospital
| Updated on: Apr 07, 2025 | 1:28 PM

Deenanath Mangeshkar Hospital inquiry committee Report: पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर पैशांसाठी रुग्णास दाखल करुन न घेतल्याचा गंभीर आरोप झाला आहे. त्यामुळे गर्भवती महिला तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या शासनाच्या समितीचा अहवाल आला आहे. त्यात मृत्यूस दीनानाथ रुग्णालय जाबाबदार असल्याचे म्हटले आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाने कोणतीही जबाबदारी पाळली नाही, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी  सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तीनपैकी एका समितीची अहवाल

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, राज्य शासनाच्या समितीचा अहवाल आला आहे. या प्रकरणात आणखी दोन समित्या आहेत. मृत्यू झालेली व्यक्ती ही माता असल्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल येणार आहे. तसेच धर्मादाय आयुक्तांचा अहवाल येणार आहेत. शासनाच्या अहवालात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. आता तीन समित्यांचे एकत्रित अहवाल आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेली तक्रार याच्यानंतर रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल.

मृत्यूला रुग्णालय जबाबदार

रूपाली चाकणकर अहवालाची माहिती देताना म्हणाल्या, रुग्णालयाने धर्मादायाची नियमावली पाळली नाही. हे शासनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. रुग्णास योग्य उपाचार मिळाले नाही. साडेपाच तास गर्भवती महिला रुग्ण मंगेशकर रुग्णालयात होती. त्यांच्यावर उपचार झाले असते तर त्या वाचल्या असत्या. त्यांच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार आहे, असा अहवाल राज्य शासनाच्या समितीचा आहे. आता इतर दोन अहवाल उद्या येतील. त्यानंतर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल.रुग्णालयाने हलगर्जीपणा अन् मग्रुरीपणा केलेला आहे. त्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे, असे त्यांनी म्हटले.

डॉ राधाकृष्ण पवार यांचा अध्यक्षतेखाली नेमलेल्या चार सदस्य समितीचा अहवाल आला. त्यातून मंगेशकर हॉस्पिटलला क्लीन चिट देण्याचा अजिबात प्रयत्न नाही. अहवालात मंगेशकर, ससून, सूर्या आणि मणिपाल चारही रुग्णालयात काय उपाचार झाले ती माहिती दिली, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.