अन् तिच्या बाळाने पोटातच प्राण सोडले, बाप कोवळं मृत अर्भक पिशवीत घेऊन आला; रायगडमध्ये नेमकं काय घडलं?

रायगड तालुक्यात माखोडा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने येथे गर्भवती महिलेच्या पोटताच बाळाचा मृत्यू झाला आहे.

अन् तिच्या बाळाने पोटातच प्राण सोडले, बाप कोवळं मृत अर्भक पिशवीत घेऊन आला; रायगडमध्ये नेमकं काय घडलं?
raigad mokhada taluka pregnent woman (गर्भवती महिलेचा सांकेतिक फोटो आणि मोखाडा जिल्हा रुग्णालाय, महिलेचा फोटो सौजन्य- मेटा एआय)
| Updated on: Jun 14, 2025 | 9:40 PM

पालघर : मोखाडा तालुक्यात माता बालमृत्यू प्रकरण थांबण्याचे नाव घेत नसून बेजबाबदार आरोग्यसेववेचे पुन्हा एकदा धिंडदवडे निघताना दिसत आहेत. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीत जोगलवाडी येथील गर्भवती महिलेस वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने तिचे बाळ पोटातच दगावले आहे. याबाबत आरोग्य प्रशासनास जाब विचारणाऱ्या तिच्या पतीस पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे.

कित्येकदा रुग्णवाहिकेसाठी केला फोन, मात्र…

जोगलवाडी येथील अविता सखाराम कवर वय २६ वर्ष हिला १० जून रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास बाळंतवेणा चालू झाल्यानमंतर शासकीय रुग्णवाहिका मिळवण्यासाठी १०८ या क्रमांकावर वर कॉल करण्यात आला. परंतु रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने सकाळी ८ वाजता पुन्हा एकदा येथील आशा कार्यकर्ती मार्फत कॉल करण्यात आला. तरीही रुग्णवाहिका न मिळाल्याने दुपारी १२:३० च्या दरम्यान खासगी वाहनाने गर्भवती महिलेस खोडाळा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु इथे उपचार शक्य नसल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात हालवण्यास सांगितले.

बाळाचा पोटातच झाला मृत्यू

या दरम्यान खोडाळा येथील रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने आसे येथील उपकेंद्रातून रुग्णवाहिका मागविण्यात आली. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलेस दाखल करण्यात आले. यावेळी तपासणी दरम्यान बाळ पोटातच मृत्यू झाल्याचे सांगितले व पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान शस्त्रक्रिया करत मातेला वाचवण्यास डॉक्टरांना यश आले आहे.

अर्भक पिशवीत टाकून बसमध्ये करावा लागला प्रवास

घटनेदरम्यान नाशिक जिल्हा रुग्णालय येथेही मृत अर्भकास घरी नेण्यास रुग्णवाहिका दिली गेली नाही. त्यामुळे महिलेचे पती सखाराम कवर याने मृत अर्भक पिशवीत टाकून ८० किलोमीटरचा प्रवास एसटीने करत आपल्या गावी आणून दफनविधी केला. या घटनेस संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून निर्दयी आरोग्य प्रशासन कुठली आरोग्य सेवा देते हेच कळेनासे झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. याबाबत सखोल चौकशी करून दोषीवर कारवाही करावी अशी कटुंबाची मागणी आहे.

…तर असे घडले नसते

जोगलवाडी येथून आशा वर्करच्या मदतीने खोडाला येथून १०८ रुग्णवाहिका घेऊन मोखाडा येथे आणण्यात आले खोडाला प्राथमिक केंद्रात बाळाचे ठोके लागत नव्हते . नाशिक येथून बापाला अर्भक पिशवीत आणावे लागले या बाबत आमच्याकडे नाशिक येथून माहिती आलेली नाही . नाशिक येथून त्यांना शववाहिनी दिली असती तर हे घडले नसते, अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांनी दिली आहे.