Aditi Tatkare: इतके बेजबाबदार कसं वागता? समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू, दिवेआगार घटनेनंतर आदिती तटकरे संतापल्या, पोलिसांना थेट जाब…
Aditi Tatkare furious over Diveagar Incident: आळंदीमधील विद्यार्थ्यांची दिवेआगार येथे सहल गेली होती. समुद्राला आलेल्या भरतीत आठ जणांचा जीव गेला. या घटनेने प्रशासनासह सर्वांनाच मोठा धक्का बसला. दिवेआगार समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. या घटनेनंतर मंत्री आदिती तटकरे यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.

रायगडमधील दिवेआगार येथील समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. समुद्राच्या भरतीचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबियांच्या दु:खाला पारावार उरला नाही. ऐन उमेदीतील विद्यार्थ्यांना काळाने हिसकावले. पण या ठिकाणच्या सुरक्षेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या सर्व घटनेवर शोक व्यक्त करतानाच महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आयोजकांसह पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले.
बचावलेल्या विद्यार्थ्यांसोबत पोलिसांना का पाठवले नाही?
दिवेआगर घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. या घटनेत जे विद्यार्थी बचावले. त्यांच्यासोबत पोलिसांना का पाठवण्यात आले नाही असा जाब मंत्री आदिती तटकरे यांनी विचारला. मंत्री अदिती तटकरे यांनी प्रवासात महिला पोलीस विद्यार्थिनी बरोबर न पाठवल्याने संताप व्यक्त केला. मुली असताना महिला पोलीस का पाठवले नाही, इतके बेजबाबदार कसे वागू शकतो आपण? असे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना खडसावले.
दिवेआगर दुर्घटनेतील आठ विद्यार्थ्यांना आदिती तटकरेनी दुःख व्यक्त केले. तटकरेंनी शोक व्यक्त केला. दुर्दैवी घटनेने मन हेलावलं. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांबाबत सरकार असल्याचे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांना समुद्राचा अंदाज आला नाही. मदतीला गेले अन् आठ जणांचा अंत झाला. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आधार देण्याचं आदिती तटकरे यांनी आश्वासन दिलं. दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर नियमांचं पालन करा असे आवाहनही आदिती तटकरे यांनी पर्यटकांना केले.
पालकमंत्री भरत गोगावले भावुक
दिवेआगर समुद्रकिनारी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत पुणे-आळंदीहून सहलीसाठी आलेल्या ४२ विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पालकमंत्री भरत गोगावले यांनी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात भेट देत मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना धीर देत दुःख व्यक्त केले.
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी पुणे, आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या ४२ विद्यार्थ्यांसह शिक्षक आले होते . समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पुणे आळंदी सह संपूर्ण महाराष्ट्रावर हळूहळू व्यक्त केली जात आहे,शवविच्छादनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दिवेआगर समुद्रकिनारी सुरक्षेचा अभाव
दिवेआगर समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांच्या बुडून मृत्यूच्या घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित बीचवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक दिशादर्शक फलक किंवा सावधानतेचा इशारा देणारे फलक दिसून येत नाहीत. त्यामुळे समुद्रातील धोकादायक भागांची माहिती पर्यटकांना कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.