PM नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीची सिल्वर जुबली; भाजपने आखला मास्टर प्लान, प्रदेशाध्यक्षांकडून पदाधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश

Seva Doot Campaign : PM नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत हे. या पार्श्वभूमीवर भाजपने मास्टर प्लान आखला आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत.

PM नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीची सिल्वर जुबली; भाजपने आखला मास्टर प्लान, प्रदेशाध्यक्षांकडून पदाधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 7:44 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होताहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने नवा मास्टर प्लान आखला आहे. यानुसार भाजप 1 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या कालावधित एक अभियान राबवणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पक्षाचे नेते थेट जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी नेते सरकारी योजनेवरून जनतेशी संवाद साधतील. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतील. या पार्श्वभूमीवर राज्यातही  भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही नेते आणि पदाधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत.

सेवा दूत अभियानाअंतर्गत भाजपचे नेते वेगळ्या-वेगळ्या विधानसभा मतदारसंघात 25 दिवस थेट जनतेशी संवाद साधतील.  खेडे, गाव, शहारातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतील. नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ किती मिळतोय, याचा आढावा घेतील. भाजप कार्यकर्त्यांसोबत नियुक्त करण्यात आलेले ‘सेवा दूत’ हे महत्वाचे भूमिका निभावणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पदाधिकारी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांना देतील. तसेच योजनांचा लाभ कसा मिळवता येईल, याची माहिती सांगतील.  देशातील गरीब, वंचितांना सरकारी योजनेचा लाभ मिळतोय का, याचा आढावा घेण्यासाठी हे अभियान आखल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांना योजनेचा लाभ मिळवण्यात अडचणीत येत असेल, तर त्या त्यांना मदत करण्याचे कार्य सेवा दूत करतील. या योजनेमुळे आगामी निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading...

 

महाराष्ट्रातही भाजप लागली कामाला 

भाजपकडून देशासहित भारतातही ‘सेवा दूत अभियान’ राबवलं जाईल. या अभियानाच्या पूर्वतयारी भाजपने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे-कोकण विभागीय कार्यशाळेला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेत अभियानाची कार्यपद्धती, नियोजन आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीविषयी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यांनी आवाहन करताना म्हटलं की, ‘समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना आवश्यक सहकार्य करणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us