Amravati track breaks down : अमरावतीजवळ रेल्वेचा ट्रॅक तुटला, वलगाव रेल्वे गेटवरील घटना, दोन प्रवासी रेल्वेंचे वेळापत्रक लांबले

| Updated on: Jul 16, 2022 | 2:58 PM

अमरावतीजवळ रेल्वेचा ट्रॅक तुटल्याची घटना घडली. अमरावती शहरापासून दहा किमी अंतरावरील वलगाव रेल्वे गेट वर ही घटना घडली. एक मालगाडी रेल्वे रुळावरून गेल्यानंतर रेल्वेचा रूळ तुटून वेगळा झाला.

Amravati track breaks down : अमरावतीजवळ रेल्वेचा ट्रॅक तुटला, वलगाव रेल्वे गेटवरील घटना, दोन प्रवासी रेल्वेंचे वेळापत्रक लांबले
अमरावतीजवळ रेल्वेचा ट्रॅक तुटला, वलगाव रेल्वे गेटवरील घटना
Image Credit source: t v 9
Follow us on

अमरावती : अमरावतीजवळ रेल्वेचा ट्रॅक तुटल्याची घटना घडली. अमरावती शहरापासून दहा किमी अंतरावरील वलगाव रेल्वे गेट वर ही घटना घडली. एक मालगाडी रेल्वे रुळावरून गेल्यानंतर रेल्वेचा रूळ तुटून वेगळा झाला. यामुळं दोन प्रवासी रेल्वेचे (Passenger Railway) वेळापत्रक लांबले आहे. दोन रेल्वे वलगाव जवळ थांबवल्याची माहिती आहे. बडनेरा (Badnera) येथील रेल्वे विभागाकडून (Railway Division) युद्ध स्तरावर तुटलेला रेल्वे ट्रक दुरुस्तीचे काम सुरू आहे. वलगावजवळ रेल्वे रुळ तुटला आहे. ही बाब तरुणाच्या लक्षात आली. जागरूक तरुणाने दिलेल्या माहितीमुळं मोठा अपघात टळला. अन्यथा एका घटनेला रेल्वे प्रशासनाला तोंड द्यावं लागलं असतं.

रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू

या रूळवरून एक मालगाडी रेल्वे रुळावरून गेल्यानंतर रेल्वेचा रूळ तुटून वेगळा झाला. ही घटना एका जागरूक तरुणाला दिसली. त्याने ही माहिती फोनद्वारे रेल्वे स्टेशन ला कळवलं. अमरावती रेल्वे प्रशासन तात्काळ कामाला लागलं. सध्या दोन प्रवासी रेल्वेचे वेळापत्रक या ट्रॅक कामामुळे लांबले आहे. दोन रेल्वे वलगावजवळ थांबवल्या आहेत. बडनेरा येथील रेल्वे विभागाकडून युद्ध स्तरावर तुटलेला रेल्वे ट्रक दुरुस्तीचे काम सुरू आहे.

नेमकं काय घडलं

या रुळावरून एक मालगाडी गेली. त्यानंतर एका युवकाला ट्रॅक तुटलेला दिसला. तुटलेल्या रुळावरून दुसरी प्रवासी गाडी आली असती, तर अपघात होण्याची शक्यता होती. पण, तत्पूर्वी युवकानं रेल्वे विभागाला ही माहिती दिली. त्यामुळं रेल्वेचे कर्मचारी ट्रॅकवर पोहचले. तो ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. तोपर्यंत इतर दोन प्रवासी रेल्वे थांबविण्यात आल्या आहेत. ट्रॅक दुरुस्त झाल्यानंतर रेल्वेगाड्या सुरू होतील.

हे सुद्धा वाचा

 

ट्रॅक दुरुस्त होईपर्यंत वाट पाहावी लागणार

प्रवाशांचा प्रवास काही काळासाठी खोळंबला आहे. पण, अपघात होण्यापासून वाचला ही मोठी बाब आहे. युवकानं प्रसंगावधान साधलं. त्यामुळं रेल्वेचे कर्मचारी लगेच कामाला लागले. आता हा ट्रॅक दुरुस्त होईस्तोवर प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे. यामुळं रेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं आहे. दोन प्रवासी गाड्या काही वेळासाठी थांबविण्यात आल्या आहेत.