PM मोदींची भूमिका करणारा दुबईचा नागरिक; राज ठाकरेंनी कोणावर साधला निशाणा?

राज ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. भारत देश सोडून परदेशात स्थायिक झालेल्या कलाकारांवरही टीका केली.

PM मोदींची भूमिका करणारा दुबईचा नागरिक; राज ठाकरेंनी कोणावर साधला निशाणा?
| Updated on: Aug 01, 2026 | 12:54 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेतून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ठाकरेंनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणाऱ्या विवेक ओबेरॉयवरही निशाणा साधला. ज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सिनेमा काढला. पंतप्रधान मोदींची भूमिका केली. तो दुबईला राहायला गेला. तो दुबईचा नागरिक आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीका केली.

मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरेंनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या सभेत राज ठाकरे म्हणाले, ‘
माझ्या राजकारणाची सुरुवात विद्यार्थी सेनेतून झाली. त्याच्यातून काम करत आणि घडत गेलो. अमित आणि त्यांचे सहकारी चांगले काम करतील, अशी अपेक्षा करतो. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर हा विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आला. मी जेव्हा कामाला सुरुवात केली. तेव्हा विषय होते. तेव्हाचा आणि आताचा विद्यार्थी वेगळा आहे. आम्ही टेलिग्रामपासून इन्स्टाग्रामचा काळ पाहिला. 1997 ते 2012 सालात जन्माला आलेले जेन-झी आहेत. फक्त इंग्रजी बोलणारे जेन-झी नसतात. जेन-झी मुले ग्रामीण भागात देखील आहेत.

‘फक्त मुंबई-पुण्यातील नव्हे. या जेन-झींना काय हवं, हे समजून घ्यायला हवं. जुन्या भ्रामक कल्पना सोडून द्यायला हव्या. आमच्या काळात लहान असताना आई सांगायच्या, त्याने बुद्धी तल्लक होते. एका माणसाने केसाला आयुष्यभर तेल चोपडलं, तरी बुद्धी आली नाही. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. हे शिक्षण-तंत्रज्ञान मंत्री आहेत’.
दगडाचे फुटप्रिंट…त्यांना फिंगरप्रिंट म्हणायचं होतं. त्यांना आधारशी लिंक करणार…कसं? मला चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट बघायचे आहेत. कोल्हापूरहून पुण्यात पाठवलं. तिथंही काही झालं नाही. असे शिक्षणमंत्री असल्यावर जेन-झीचा पारा चढणार नाही का? असा सवाल त्यांनी केला.

‘मोदी म्हणाले, आंदोलनातील भाषा अयोग्य नाही. कोणाच्याही बाबतीत खालच्या स्तरातील भाषा वापरू नये. पंतप्रधानांची गोष्ट 100 टक्के मान्य आहे. परंतु तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, आतापर्यंत…सगळ्यापर्यंत आमच्यापर्यंत. तुमची ट्रोल कणारी लोक प्रत्येक राज्यात आहेत. अनेक कलाकार म्हणतात, बोलायलाच नको. शिव्या पडतात. पंतप्रधानांनी सांगावं. तेही बंद करावं. गेल्या १२ वर्षातच सुरू झालंय. भाजपच्या ट्रोल टीमने सुरू केलंय, त्यातूनच सर्व हे उगवलं. तेच तुमच्या अंगाशी आलंय, असे पुढे म्हणाले.

‘ज्याने मोदींवर सिनेमा काढला. मोदींची भूमिका केली. तो दुबईला राहायला गेला. तो दुबईचा नागरिक आहे. मोदींनी उद्योग आणले. देशासाठी काय काय करतात अशी मुक्ताफळे उधळणारा आर माधवन कुठे राहतो. तो दुबईत स्थायिक झाला. त्यांना देशावर प्रेम आहे. मोदींवर विश्वास आहे. विकासावर विश्वास आहे तर परदेशात का राहतात. कुटुंबासोबत राहतात. इथे येतात स्पॉन्सर्ड फिल्ममध्ये काम करणार. धुरंधर बिरंदर आणि परदेशात जाऊन राहणार. ही लोकं परदेशात जात आहे. या मुलांचं काय घेऊन बसला, अशी टीका त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us