राज ठाकरेंच्या मनसेने मुंबईचं दार ठोठावलं, BMC पासून हाकेच्या अंतरावरील ग्रामपंचायत जिंकली

| Updated on: Jan 18, 2021 | 6:06 PM

Raj Thackeray MNS Gram Panchayat result : मनसेने मुंबईजवळची ग्रामपंचायत असो की तिकडे विदर्भ, आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे.

राज ठाकरेंच्या मनसेने मुंबईचं दार ठोठावलं, BMC पासून हाकेच्या अंतरावरील ग्रामपंचायत जिंकली
राज ठाकरेंच्या मनसेचा निकाल काय?
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी ग्रामपंचायत निवडणूक (Maharashtra Gram Panchayat result) ताकदीने लढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानुसार मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद लावल्याचं दिसतंय. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईजवळची ग्रामपंचायत असो की तिकडे विदर्भ, आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. मनसेने एकट्या यवतमाळमध्ये 15 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. इतकंच नाही तर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथमधील एका ग्रामपंचायतीवर मनसेने विजय मिळवला आहे. (Raj Thackeray party MNS performance in Maharashtra Gram Panchayat result)

मनसेने अंबरनाथ तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत वर्चस्व मिळवत ग्रामपंचायतीत झोकात एण्ट्री केली. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने दणदणीत विजय मिळवला.

काकोळी ग्रामपंचाय निवडणुकीत मनसेने भाजप समर्थक पॅनलचा धुव्वा उडवला. काकोळी ग्रामपंचायतीची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. या ग्रामपंचायतीवर एकूण सात सदस्य निवडून जातात. यंदाच्या निवडणुकीत मनसेने 4 सदस्यांसह विजय मिळवला आहे.

यवतमाळमध्ये झंझावात

ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या (Gram panchyat election results) सकाळच्या सत्रात खातेही न उघडू शकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) इंजिन दुपारनंतर जोरात धावायला लागले आहे. यवतमाळमध्ये तर मनसेला घवघवीत यश मिळाले आहे. येथील वणी मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील 15 ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेने जिंकलेल्या 15 ग्रामपंचायतींमध्ये शिरपूर, मोहूर्ली, येनक, खांदला, खांदला, चंडकापुर, बाबापूर, मोहदा, शिंदी, माहागाव , गदाजी बोरी, करणवाडी या गावांचा समावेश आहे.

अहमदनगरमध्येही खातं उघडलं

अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे.

आणखी कोणत्या ग्रामपंचायींवर मनसेचा झेंडा

* सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायतीमधील सातपैकी 5 जागांवर मनसेने विजय मिळवला.
* अहमदनगरच्या शिरसटवाडी ग्रामपंचायमध्ये मनसेचे 9 सदस्य विजयी
* अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील खैरी सावंगी वाढोणा गट ग्रामपंचायतींमध्ये मनसेचे ०७ पैकी ०७ उमेदवार विजयी
* आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीमध्ये सातपैकी सहा जागांवर मनसेचा विजय

(Raj Thackeray party MNS performance in Maharashtra Gram Panchayat result)

ग्रामपंचाय निवडणुकीचं महाकव्हरेज

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021: …अखेर मनसेचं इंजिन धावलं; यवतमाळमध्ये राज ठाकरेंच्या पक्षाला घवघवीत यश

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : शिवसेना-भाजपला जोरदार टक्कर, मनसेचा ‘या’ ग्रामपंचायतीवर झेंडा