महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021: …अखेर मनसेचं इंजिन धावलं; यवतमाळमध्ये राज ठाकरेंच्या पक्षाला घवघवीत यश

वणी मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील 15 ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. | gram panchayat election results 2021

  • विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ
  • Published On - 16:21 PM, 18 Jan 2021
महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021:  ...अखेर मनसेचं इंजिन धावलं; यवतमाळमध्ये राज ठाकरेंच्या पक्षाला घवघवीत यश
राज ठाकरे

यवतमाळ: ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या (Gram panchyat election results)  सकाळच्या सत्रात खातेही न उघडू शकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) इंजिन दुपारनंतर जोरात धावायला लागले आहे. यवतमाळमध्ये तर मनसेला घवघवीत यश मिळाले आहे. येथील वणी मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील 15 ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेने जिंकलेल्या 15 ग्रामपंचायतींमध्ये शिरपूर, मोहूर्ली, येनक, खांदला, खांदला, चंडकापुर, बाबापूर, मोहदा, शिंदी, माहागाव , गदाजी बोरी, करणवाडी या गावांचा समावेश आहे. (MNS get major success in gram panchayat election results 2021)

याशिवाय, राज्याच्या इतर भागांमध्येही मनसेने खाते उघडले आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी गावात मनसेने शिवसेना-भाजप युतीला धूळ चारत विजय मिळवला आहे. अमरावती जिल्ह्यातील खैरी सावंगी वाढोणा ग्रुप ग्रामपंचायतीमध्येही मनसेनं एकहाती विजय मिळवला आहे. पक्षानं ७ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत.

आणखी कोणत्या ग्रामपंचायींवर मनसेचा झेंडा

* सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायतीमधील सातपैकी 5 जागांवर मनसेने विजय मिळवला.
* अहमदनगरच्या शिरसटवाडी ग्रामपंचायमध्ये मनसेचे 9 सदस्य विजयी
* अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील खैरी सावंगी वाढोणा गट ग्रामपंचायतींमध्ये मनसेचे ०७ पैकी ०७ उमेदवार विजयी
* आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीमध्ये सातपैकी सहा जागांवर मनसेचा विजय

शिवसेनेची राज्यभरात जोरदार घौडदौड

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला महाविकासआघाडीने एकत्र निवडणूक लढवल्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार महाविकासआघाडीत शिवसेना सर्वाधिक 10210ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना आघाडीवर आहे. तर अनेक ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनाप्रणित पॅनेल्सनी बाजी मारली आहे.

मी पक्षात होतो म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती: नारायण राणे

कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. महाविकासआघाडीने भाजपला (BJP) दणका वैगेरे दिलेला नाही. आकडेवारी समोर आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यावेळी भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे. पुढच्यावेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

Satara Gram Panchayat Election Results 2021: खासदार उदयनराजेंना धक्का; दत्तक गावात दारूण पराभव

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : सरपंच आरक्षणाची सोडत कधी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात….

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : शिवसेना-भाजपला जोरदार टक्कर, मनसेचा ‘या’ ग्रामपंचायतीवर झेंडा

(MNS get major success in gram panchayat election results 2021)