Raj thackeray granddaughter : राज ठाकरेंच्या नातीच्या नावाची जोरदार चर्चा, ठेवले ऐतिहासिक नाव..

Raj thackeray granddaughter : राज ठाकरेंनी लाडक्या नातीचं नाव बारसं केलं आहे. नातीच्या ऐतिहासिक नावाची जोरदार चर्चा होत आहे.

Raj thackeray granddaughter : राज ठाकरेंच्या नातीच्या नावाची जोरदार चर्चा, ठेवले ऐतिहासिक नाव..
raj thackeray family
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 1:45 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या घरात काही महिन्यांपूर्वी चिमुकलीचं आगमन झालं. नातीच्या आगमनामुळे ठाकरेंच्या घरांत आनंदी वातावरण आहे. आता दिवाळीच्या तोंडावर अमित ठाकरे यांच्या कन्येचं बारसं झालं. राज ठाकरेंनी लाडक्या नातीचं नाव अहिल्या असं ठेवले आहे. अहिल्या या नावाचा अर्थ देखील खास आहे.

अमित ठाकरे यांचा मुलगा कियानला 7 सप्टेंबर रोजी अहिल्याच्या रुपात बहीण भेटली. घरात कन्यारत्नाचं आगमन झाल्यानंतर ठाकरे कुटुंबाने एकच जल्लोष केला होता.  आता राज ठाकरे यांनी लाडक्या नातीचं ‘अहिल्या’ हे ऐतिहासिक नाव ठेवलं आहे.  ठाकरेंच्या लाडक्या नातीच्या ऐतिहासिक नावाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. नातीच्या नावाचा अर्थ सुंदर असा देखील होतो.  अहिल्या नावाचा अर्थ संस्कृतमध्ये सुंदर, निष्कलंक, पवित्र आणि दोषरहित असा होतो. तर हिंदू पुराणातही अहिल्या नावाचा अर्थ आढळतो. अहिल्या या गौतम ऋषींच्या पत्नी होत्या. अहिल्या नावास सौंदर्य, पावित्र्य आणि सामर्थ्याचं प्रतीक देखील मानलं जातं.

Loading...

ऐतिहासिक नाव…

खरंतर अहिल्या हे ऐतिहासिक नाव आहे. लोकमाता अहिल्या होळकर यांच्या कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरात केला जातो. अहिल्या होळकर यांच्या कृतिशील कार्याची आज देखील दखल घेतली जाते. अहिल्या होळकर यांच्या नावावरून महाराष्ट्रातील जिल्ह्याला अहिल्यानगर असे नाव देण्यात आलं. त्यांनी चतूर, क्षमाशील व शांत स्वभावाने कुटुंबातील अनेकांची मने जिंकली होती.

पहिला मुलगा…

अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह 27 जानेवारी 2019 रोजी झाला. अमित आणि मिताली यांना पहिला मुलगा आहे. त्यांच्या मुलाचे नाव हे कियान असं आहे. आता या दाम्पत्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी देखील आली आहे. अहिल्याच्या पावलाने शिवतीर्थ बंगल्यात आनंदीआनंद आहे.

अमित ठाकरेंची राजकीय कारकीर्द कधी सुरू झाली?

अमित ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांनी 2024 साली विधानसभा निवडणूक ही माहीम विधानसभा मतदारसंघातून लढवली. त्यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु त्यांना माहीममध्ये पराभव स्वीकारावा लागला. माहीममध्ये ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us