Rajarshi Shahu Maharaj: राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षण क्षेत्रातील या धाडसी निर्णयाने बदलले सर्वसामान्यांचे आयुष्य

| Updated on: May 06, 2022 | 9:00 AM

शाहू महाराजांनी स्त्रीशिक्षणाकडे अधिक लक्ष दिले. यासाठी त्यांनी मुलींसाठी शाळा सुरु केल्या व शाळा व महाविद्यालयातील मुलींना मोफत शिक्षण दिले.

Rajarshi Shahu Maharaj: राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षण क्षेत्रातील या धाडसी निर्णयाने बदलले सर्वसामान्यांचे आयुष्य
Image Credit source: TV9
Follow us on
  1. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा आज 100 वा स्मृती शताब्दी दिन राज्यभरात साजरा केला जात आहे. या शंभराव्या स्मृती शताब्दी दिनाच्या निमित्ताने सर्वत्र त्याच्या महान कार्याचे समरण केले जात आहे. राजर्षी शाहूंनी आपल्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांनी सर्वसामान्य माणसांचे आयुष्य बदलून गेले. शैक्षणिक कार्यात मोलाचे योगदान देत त्यांनी शिक्षणबाबत अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.
  2. शाहू महाराजांनी शिक्षण हे एक क्रांतीचे साधन मानून त्यांनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक मोफत आणि सक्तीचे करण्याचा कायदा1916 मध्ये पास केला. अशाप्रकारचा कायदा करणारे कोल्हापूर संस्थान हे भारतातील पहिले संस्थान होते.
  3. प्राथमिक शिक्षणाबरोबर शाहू महाराजांनी माध्यमिक उच्च व तंत्रशिक्षणाला महत्त्व दिले. 1851  मध्ये सुरु झालेल्या इंग्रजी शाळेचे रुपांतर त्यांनी 1881 मध्ये राजाराम महाविद्यालयात केले. त्यांनी तंत्रशिक्षणाला महत्त्व देऊन ‘जयसिंगराव घाटगे तांत्रिक संस्था’ सुरु करुन लष्करी शिक्षणासाठी ‘इन्फॅन्ट्री स्कूल’ सुरु केले.
  4. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील कारभार व्यवस्थित चालविण्यासाठी प्रशिक्षित तलाठी व पाटील निर्माण करण्यासाठी ‘प्रशासकीय शाळा’ सुरु केल्या.
  5. हे सुद्धा वाचा
  6. हुशार व प्रशिक्षित शिक्षकांची भरती शाळेंमध्ये करण्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्रे सुरु केली.त्यांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे, शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या व परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या जाहीर केल्या. त्यासाठी त्यांनी कोल्हापूर येथे सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी एकच वसतीगृह सुरु केले. या वसतीगृहाचा लाभ प्रामुख्याने ब्राह्मण विद्यार्थ्यांना झाल्याने शाहू महाराजांनी जातीवार वसतीगृहे स्थापण्याचा निर्णय घेतला.
  7. 1901 मध्ये महाराजांनी मराठा जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग’ सुरु केली तसेच लिंगायत, वैश्य, चांभार, शिंपी, ढोर इत्यादी जातीच्या विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र वस्तीगृहे स्थापन केली.
  8. शाहू महाराजांनी स्त्रीशिक्षणाकडे अधिक लक्ष दिले. यासाठी त्यांनी मुलींसाठी शाळा सुरु केल्या व शाळा व महाविद्यालयातील मुलींना मोफत शिक्षणदिले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी त्यांनीच शिष्यवृत्ती देऊन आपल्या चळवळीचा वारसा त्यांना दिला आहे.