होय मी प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील आरोपींना ओळखतो, पण… राजेंद्र शिंदे यांनी केले मान्य, कनेक्शन थेट पुढे..

Rajendra Shinde and Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठे आरोप केले जात आहेत. त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांच्या पतीला पोलिसांनी चाैकशीसाठी बोलावले. यावेळी त्यांनी काही गोष्टी मान्य केल्याचे बघायला मिळतंय. त्यामुळे पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे बोलले जातंय.

होय मी प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील आरोपींना ओळखतो, पण... राजेंद्र शिंदे यांनी केले मान्य, कनेक्शन थेट पुढे..
Pradeep Purnekar and Rajendra Shinde
| Updated on: Oct 15, 2026 | 1:37 PM

शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली. पूर्णेकर प्रकरणात मोठ्या अपडेट पुढे येत आहेत. तपासाला वेग आला. पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी महापाैर मिनाक्षी शिंदे यांच्या पतीला चाैकशीकरिता बोलावले होते. यादरम्यान धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मिनाक्षी शिंदेंच्या पतीने सुनावणीदरम्यान मोठा खुलासा केला. यावेळी मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे आणि प्रदीप पूर्णेकर यांच्या प्रकरणातील संशयित आरोपींना बसून पोलिसांनी समोरासमोर चाैकशी केली. या तपासात पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती लागली आहे. राजेंद्र शिंदे यांनी यादरम्यान मोठी माहिती दिली. त्यांनी मान्य केले की, ते प्रदीप पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना ओळखतात. त्यांची पूर्वीचीच ओळख आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या प्रकरणात असलेल्या पाचही आरोपींना मी ओळखतो. हे माझ्याकडे काम मागण्यासाठी येत. माझी पत्नी त्या भागातील नगरसेविका असल्याने ते येत. पण मी त्यांना ओळख असलो तरीही माझा प्रदीप पूर्णेकर प्रकरणाशी काहीच संबंध नाही. राजेंद्र शिंदे यांच्या जबाबाने पूर्णेकर कुटुंबियांचा संशय खरा असल्याचे दिसतंय. प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा अगोदर पासूनच मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर आरोप करत आहेत.

Loading...

त्यातच राजेंद्र शिंदेंनी मान्य केले की, मी अगोदरपासून पाचही आरोपींना ओळखतो. प्रदीप पूर्णेकरच्या मुलाने म्हटले आहे की, माझ्या वडिलांची घटना घडण्यापूर्वी मी राजेंद्र शिंदे आणि मारेकऱ्यांना शिंदे राहत असलेल्या घरी निळकंठ इमारती बाहेर बघितले होते. याच इमारतीमध्ये बैठक झाली होती आणि तिथेच कट रचला होता.

त्यातच राजेंद्र शिंदे यांचा जबाब नोंदवण्यात आला. आता पोलिस पुढे नक्की काय कारवाई करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. याबाबत अनेक मोठ्या अपडेट येत आहेत. पूर्णेकर कुटुंबियांकडून सुरूवातीपासूनच काही आरोप करण्यात आले. त्यांच्या प्रत्येक आरोपात पूर्णेकर कुटुंबियांच्या नावाचा उल्लेख हा बघायला मिळाला. त्यात राजेंद्र शिंदे यांची चाैकशीही पोलिसांकडून करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us