महाराष्ट्रात आणखी कडक निर्बंध येणार? आरोग्यमंत्री टोपे म्हणतात, दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; केंद्राची टीम राज्याच्या दौऱ्यावर

| Updated on: Dec 29, 2021 | 1:03 PM

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या हा धोक्याचा अलार्म आहे. दोन दिवसांमध्ये रुग्णांची दुप्पट वाढ झाली आहे. त्यात मुंबईचा पॉझिटिव्हीची रेट हा चार टक्क्यांवर गेला आहे. ही परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे.

महाराष्ट्रात आणखी कडक निर्बंध येणार? आरोग्यमंत्री टोपे म्हणतात, दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; केंद्राची टीम राज्याच्या दौऱ्यावर
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us on

मुंबईः महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दोन दिवसांत रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन दिवसांत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार

राजेश टोपे म्हणाले की, राज्यात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या हा धोक्याचा अलार्म आहे. दोन दिवसांमध्ये रुग्णांची दुप्पट वाढ झाली आहे. त्यात मुंबईचा पॉझिटिव्हीची रेट हा चार टक्क्यांवर गेला आहे. ही परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ याबाबत निर्णय घेईल.

केंद्राची टीम दौऱ्यावर

राजेश टोपे म्हणाले की, केंद्राची टीम सध्या महाराष्ट्राच्या दोन-तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. ही टीम वाढलेले रुग्ण, त्यांचे प्रमाण, ओमिक्रॉनचे रुग्ण, लसीकरण, पहिला डोस आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या या साऱ्यांचे अवलोकन करणार आहे. राज्यात 87 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ही 57 टक्के आहे. आतापर्यंत 8 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता बोस्टर डोस देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र, कोव्हॅक्सीन लस घेतलेल्या व्यक्तीला कोव्हॅक्सीनचाच बूस्टर डोस द्यायचा की आणखी कुठला, याचे मार्गदर्शन आयसीएमआरकडे मागितले आहे. ते ज्या सूचना देतील, त्यानुसार पालन केले जाईल. मात्र, लसीकरणासाठी स्थानिक नेते, प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे. स्थानिक नेत्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

क्वारंटाईन किती दिवस?

अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांचा क्वारंटाईन काळ कमी करण्यात आला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता टोपे म्हणाले की, याबाबतचा निर्णय हा आयसीएमआरच्या निर्देशानुसार घेण्यात येईल. गरज पडल्यास आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देऊ. मात्र, ज्यांना शक्य असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करा आणि काळजी घ्या. महाराष्ट्रात आपण दिवसाला 8 लाख लसीकरण करत होतो, आता आपण 5 लाख लसीकरण करत आहोत. हे आपल्याला भूषणावह नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

10 जानेवारीपासून बूस्टर डोस

राजेश टोपे पुढे म्हणाले की, हायरिस्क देशातून आलेल्यांची चाचणी करून त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने आता नवीन घोषणा केली. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लस द्यायची आहे. आम्ही त्या दृष्टीने सज्ज आहोत. या संदर्भात मी विधानसभेत बोललो आहे. शाळेत कोरोना लसीकरण करता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. कोमॉर्बिड आणि फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, कोणती लस द्यायची यासंदर्भात आयसीएमआरने माहिती दिलेली नाही. बूस्टर डोसचे लसीकरण 10 जानेवारीपासून होणार असल्याचे ते म्हणाले.

इतर बातम्याः

Bhagat Singh Koshyari’s letter to CM Uddhav Thackeray: तुमचं पत्रं अपमान आणि बदनामी करणारं, मुख्यमंत्र्यांच्या पत्राला राज्यपालांचं कडक शब्दात उत्तर, वाचा संपूर्ण पत्र जशास तसं

Omicron संसर्गाच्या वाढत्या वेगानं धडकी, दिल्लीनं महाराष्ट्राला मागं टाकलं, देशाची रुग्णसंख्या 781 वर