Video | विषय गंभीर आठवले खंबीर ! क्रांती रेडकरांच्या पत्रकार परिषदेत कवितांमुळे पिकला हशा

| Updated on: Oct 31, 2021 | 11:07 PM

आरपीयचे (आठवले गट) अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा ह्यूमर तसेच विनोदबुद्धाचा पूर्ण महाराष्ट्र चाहता आहे. त्यांच्या कवितांनी तर थेट संसदेपर्यंत धम्माल उडवून दिलीय. सध्या त्यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना पाठिंबा दिलाय.

Video | विषय गंभीर आठवले खंबीर ! क्रांती रेडकरांच्या पत्रकार परिषदेत कवितांमुळे पिकला हशा
RAMDAS ATHAWALE KRANTI REDKAR
Follow us on

मुंबई : आरपीयचे (आठवले गट) अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा ह्यूमर तसेच विनोदबुद्धीचा पूर्ण महाराष्ट्र चाहता आहे. त्यांच्या कवितांनी तर थेट संसदेपर्यंत धम्माल उडवून दिलीय. सध्या त्यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना पाठिंबा दिलाय. त्यांनी वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे तसेच पत्नी क्रांती रेडकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आहे. अशा गंभीर विषयावर पत्रकार प्रश्न विचारत असतानादेखील आठवले यांची चारोळ्या तसेच हास्यविनोद केले आहेत. आठवलेंचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

रामदास आठवलेंनी दिला क्रांती रेडकर यांना पाठिंबा

मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे तसेच त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी आपले धर्मांतर लपवून नोकरी बळकावल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. हे सर्व आरोप वानखेडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी फेटाळले आहेत. वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्यावर टीका केलेली आहे. आज रामदास आठवले यांनी वानखेडे परिवाराला पाठिंबा दर्शविला. तसेच क्रांती रेकडर आणि ज्ञानदेव वानखेडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहिले. मागच्या 4 दिवसांपासून क्रांती रेडकर यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत आहे. मात्र आज आठवलेंच्या कविता आणि विनोदबुद्धीमुळे त्यांनादेखील हसू आवरले नाही.

भाजपचं नाव घुसवण्याचा प्रयत्न करुन बघितला

क्रांती रेडकर यांचे सासरे पत्रकार परिषदेत पुरावा म्हणून मतदानपत्र दाखवत होते. यावेळी आठवलेंनी हळूच शिवसेनेला मतदान केल्याचा विषय काढला. मतदानाचा विषय निघाल्यावर क्रांती रेडकरांच्या सासऱ्यांनी आजवर त्यांनी कोणकोणत्या पक्षाला मतदान केलं, त्याची जाहीरपणे नावं घेतली. त्यात भाजपचा उल्लेख नसल्यामुळे आठवलेंनी हळूच भाजपचं नाव घुसवण्याचा प्रयत्न करुन बघितला. आठवले यांच्या या कृत्यामुळेदेखील चांगलाच हशा पिकला.

क्रांती रेडकर यांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं

त्यानंतर क्रांती रेडकर यांच्या सासऱ्यांनी मलिक यांच्या भंगार व्यवसायावरुन आरोप केले. त्याचवेळेला ऐनवेळेस सूचलेली नवीकोरी चारोळी टाकून आठवलेंनी हशा पिकवला. मलिक यांच्या आरोपांवर उत्तरं देताना क्रांती रेडकर काही दिवसांपूर्वी अत्यंत तणावात दिसत होत्या. मात्र आज आठवले यांनी त्यांना फक्त पाठिंबाच दिला नाही, तर रडवेल्या झालेल्या चेहऱ्यावर हसूही पेरलं.

इतर बातम्या :

महाविकास आघाडीमध्ये दूध साखरेसारखी ‌गोडी, आदित्य ठाकरेंची बाळासाहेब थोरातांसमोर चौफेर फटकेबाजी

भाईंदर रेल्वे स्टेशन, 24 लाखांची तांब्याची वायर आणि 29 चोरटे, रेल्वे पोलिसांनी पद्धतशीरपणे आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Health Department Recruitment | आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर एक तासाआधीच फुटला ? भंडारा, पुण्यात विद्यार्थी आक्रमक

(ramdas athawale supports sameer wankhede kranti redkar have jock and fun in press conference)