AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Health Department Recruitment | आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर एक तासाआधीच फुटला ? भंडारा, पुण्यात विद्यार्थी आक्रमक

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘गट ड’ संवर्गातील विविध पदांसाठी परीक्षा पार पडली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांत या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या परीक्षेत राज्यातील अनेक शहरांत मोठा गोंधळ उडाला. भंडारा तसेच पुण्यासारख्या मोठ्या शहरात ऐन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

Maharashtra Health Department Recruitment | आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर एक तासाआधीच फुटला ? भंडारा, पुण्यात विद्यार्थी आक्रमक
HEALTH DEPARTMENT RECRUITMENT PAPER LEAK
| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 9:09 PM
Share

पुणे/ भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘गट ड’ संवर्गातील विविध पदांसाठी आज (31 ऑक्टोबर) परीक्षा पार पडली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांत या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या परीक्षेत राज्यातील अनेक शहरांत मोठा गोंधळ उडाला. भंडारा तसेच पुण्यासारख्या मोठ्या शहरात ऐन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. या गोंधळामुळे सध्या राज्य सरकार तसेच परीक्षेचे आयोजन करणारी ‘न्यासा कम्युनिकेशन’ या खासगी कंपनीवर सडकून टीका केली जात आहे.

भंडारा जिल्ह्यात एका तासाआधीच पेपर फुटल्याचा आरोप  

आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील शारदा विद्यालयात घडली. येथे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडे प्रवेशपत्र असूनदेखील त्यांना परीक्षा देता आलेली नाही. प्रवेशपत्रावर नमूद केलेला परीक्षा केंद्राचा पत्ता तसेच आसन क्रमांक परीक्षा केंद्रावर उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेली नाही. यामध्ये लातूर, परभणी, गोंदिया या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षा केंद्रावर पेपरची वेळ 2 ते 4 होती. मात्र आरोग्य विभागाचा पेपर 2.30 वाजता घेण्यात आला. त्यामुळेदेखील काही काळ परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.

तसेच परीक्षेचा पेपर एक तासाआधीच फुटला होता, असा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे तसे फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर आमची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विधार्थ्यांनी केली आहे.

पुणे शहरात पेपर फुटल्याचा आरोप, विद्यार्थी आक्रमक

पुणे शहरातदेखील आरोग्य विभागाच्या गट ड प्रवर्गाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप केला जातोय. हा प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

राज्यात 1364 केंद्रांवर परीक्षेचे आयोजन

दरम्यान, आरोग्य विभागाच्या गट ड प्रवर्गातील भरती प्रक्रियेसाठी आज लेखी परीक्षा घेण्यात आली. या भरती परीक्षेसाठी तब्बल 4,61,497 उमेदवारांनी अर्जनोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे 3 लाख 60 हजार उमेदवारांनी आपले परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड केले होते. या परीक्षेद्वारे भरली जाणारी काही पदे जिल्हास्तरीय असल्याने काही उमेदवारांनी एकाहून अधिक जिल्ह्यांतील पदांसाठी स्वतंत्र अर्जनोंदणी केली होती. राज्यात तब्बल 1364 केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. एकाच सत्रात सर्व पदांसाठी ही परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी पार पडली

इतर बातम्या :

Special story | देशात हलकल्लोळ, 29 गोळ्या झाडून इंदिरा गांधी यांची हत्या, त्याच दिवशी पंतप्रधानपदाचा पेच कसा सुटला?, वाचा इन्साईड स्टोरी

Covid Vaccination: 50 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेल्या राज्यांची पंतप्रधान मोदी घेणार बैठक, महाराष्ट्राचा समावेश

Jammu & Kashmir: NIA कडून आणखी दोन आरोपींना अटक; जम्मू-राजौरी राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला

(Maharashtra Health Department Group D Cadre Recruitment Examination paper leak in pune bhandara district)

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.